29 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeटॉप न्यूजमुंबईत लग्न समारंभाला आलेल्या पुण्यातील ४२ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण

मुंबईत लग्न समारंभाला आलेल्या पुण्यातील ४२ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण

टीम लय भारी

मुंबई/पुणे : पुण्यातील एका ४२ वर्षीय महिलेला कोरोनाची (Coronavirus) लागण झाल्याचे निष्पन्न आहे. तिची प्रकृती अत्यवस्थ असून व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. या महिलेने परदेश प्रवास केलेला नाही. मात्र तरीही तिला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा अहवाल शनिवारी समोर आला आहे. विशेष म्हणजे, त्याआधी या महिलेने मुंबईत एका लग्न समारंभात हजेरी लावल्याचे उघडकीस आल्याने आता प्रशासनाची धावपळ उडाली आहे.

मुंबईत लग्न समारंभाला आलेल्या पुण्यातील ४२ वर्षीय महिलेला कोरोनाची लागणयाआधी कोरोना व्हायरसचे आढळळेले जवळपास सर्वच रुग्ण परदेश दौऱ्यावरून आलेले आहेत. मात्र, या महिलेची कुठल्याही परदेश दौऱ्याची हिस्ट्री नाही. तिला पुण्यात राहूनच संसर्ग झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू असून डॉक्टरांनी तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. गेल्या २४ तासांपासून ती व्हेंटिलेटरवर आहे.

या ४२ वर्षीय महिलेने मुंबईतील एका लग्नात नुकतीच हजेरी लावली होती. यानंतर १६ मार्चला श्वसनात त्रास होत असल्याने तिला उपचारासाठी पु्ण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर तिच्या घशात खव-खव आणि श्वास घेण्यात आणखी त्रास होण्यास सुरुवात झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता तिच्या स्वॅबचे नमूने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्यामध्ये तिचा एच१एन१ चा रिपोर्ट निगेटीव्ह आला. तर कोरोना व्हायरसचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे ती कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आली असावी असे सांगितले जात आहे.

दरम्यान, राज्यात शनिवारी कोरोनाग्रस्तांची संख्या ११ ने वाढून तब्बल ६३ झाली आहे. एका दिवसात राज्यात झालेली ही सर्वात मोठी वाढ असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी