31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeटॉप न्यूजAl-Zawahiri : ड्रोन हल्ल्यात अमेरिकेने केला जवाहिरीचा खात्मा

Al-Zawahiri : ड्रोन हल्ल्यात अमेरिकेने केला जवाहिरीचा खात्मा

11 वर्षांपूर्वी अमेरिकेने लादेनचा खात्मा केला होता. त्यानंतर जवाहिरीने अल कायदयाची सूत्र हाती घेतली होती. अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यात जावाहिरी हा देखील मुख्यसूत्रधार होता. अमेरिकेनेअफगाणिस्तानात केलेल्या ड्रोन हल्ल्यात जवाहिरीचा मृत्यू झाला आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये तालिबानचा गृहमंत्री हक्कानीच्या घरात जवाहिरी लपून होता. अमेरिकेने सेफ हाऊसमध्ये लपून बसलेल्या जवाहिरीचा अचूक वेध घेतला. त्याच्यावर 25 लाख डॉलर्सचे बक्षीसही होते. त्यामुळे जवाहिरीच्या मृत्यूनंतर 9/11 च्या हल्ल्याचा बदला पूर्ण झाला अशी भावना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या इत‍िहासातील तो काळा दिवस होता.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी याबाबत ट्वीट करून सांगितले की, रविवारी माझ्या आदेशानुसार, काबुलमधील हवाई हल्ल्यात अल-जवाहिरी मारला गेला. आता न्याय मिळाला आहे. अमेरिकेने रविवारी सकाळी 6.18 वाजता एका गुप्त कारवाईत अल-कायदा जवाहिरीला ठार केले. अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये सीआयएनेकेलेल्या ड्रोन हल्ल्यात अल-कायदाचा प्रमुख मारला गेला. या घटनेनंतर तालिबानचा भडका उडाला. या हल्ल्यामुळे दोहा कराराचे उल्लंघन झाल्याच म्हटले आहे.

या क्षेपणास्त्राचे R9X नाव आहे. हे क्षेपणास्त्र अत्याधुनिक आहे. हे क्षेपणास्त्र कोणत्याही स्फोटाशिवाय शत्रूचा खात्मा करु शकते. या क्षेपणास्त्रातून ६ ब्लेड बाहेर येतात. क्षेपणास्त्राचे ब्लेड इतके घातक असतात की, ते इमारतीचे आणि कारचे छत देखील कापू शकतात. या क्षेपणास्त्राचे लक्ष्य इतके अचूक असते की, त्यामुळे अजूबाजूच्या लोकांना इजा होण्याची शक्यता कमी असते. अमेरिकेत दहशतवादी नेत्यांना मारण्यासाठी हे क्षेपणास्त्र विकस‍ित करण्यात आले. त्याची सुधारित आवृत्ती हेलफायर मिसाइल म्हणूनही ओळखली जाते. हे क्षेपणास्त्र अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराक, सीरिया, सोमालिया, येमेन इत्यादी देशांतील दहशतवादी कारवायांवर आळा घालण्यासाठी बनवण्यात आले. बराक ओबामांच्या काळात हे क्षेपणास्त्र तयार करण्यात आले.

अनेक वेळा दहशतवादी आपले स्वत:चे संरक्षण करण्यासाठी महिला आणि मुलांचा वापर करतात. आशा प्रकारची संरक्षक ढाल बनवल्यानंतर त्यांचा हल्ल्यापासून बचाव होऊ शकतो. त्यामुळेच हे नवीन तंत्रज्ञान विकस‍ित करु क्षेपणास्त्र बनविण्यात आले. त्यामुळे इतरांचा विनाकारण बळी जाणार नाही. या घटनेची बातमी प्रसारीत होण्यापूर्वी सोमवारी दुपारी जो बाईडन संध्याकाळी एका आतंकवादी अभ‍ियाना विषयी बोलणार आहेत असे सांगितले. मात्र व्हाईट हाऊसकडून कोणत्याही व्यक्तीचे नाव घेण्यात आले नव्हते.

अमेरिकेच्या एयर स्ट्राइकमध्ये मारल्या गेलेल्या व्यक्तीचे नाव अल-जवाहिरी असल्याचे प्रसारीत करण्यात आले. अल-जवाहिरी हा ओसामा बिन लादेन नंतरचा दोन नंबरचा आतंकवादी होता. 9/11 च्या हल्ल्यामध्ये  विमाने हायजॅक करण्यासाठी मदत केली होती. त्यावेळी दोन विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटर (WTC) वर तर एक विमान टॉवरवर जाऊन धडकला होता. तिसरा विमान अमेरिकी रक्षा मंत्रालय म्हणजेच पेंटागनवर आदळला होता. चौथा विमान शेंकविलेमध्ये शेतात जावून पडला होता. या घटनेमध्ये सुमारे ३००० लोक मारले गेले होते.

हे सुद्धा वाचा :

‘गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा’

शिंदे सरकारने काढले एका महिन्यात ७०० पेक्षा अधिक शासन निर्णय

अगला स्टेशन ‘ मातोश्री’…? असं कसं घडू शकतं ? (दिवाकर शेजवळ)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी