30 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeनिवडणूकविधान परिषद पदवीधर निवडणूकीत भाजपने खाते उघडले; कोकणात ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

विधान परिषद पदवीधर निवडणूकीत भाजपने खाते उघडले; कोकणात ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या (Vidhan Parishad Graduate Constituency Election) पाच जागांसाठी आज मतमोजणी होत असून भाजपचा कोकणमधील (Konkan) जागेवर उमेदवार निवडणून आला आहे. कोकणमधून भाजप महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे (Dyaneshwar Mhatre ) हे विजयी झाले आहेत. तर नागपूर, नाशिक, अमरावती, औरंगाबाद येथील निकाल येणे बाकी असून या निकालांकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. (Dyaneshwar Mhatre of BJP candidate won from Konkan in Vidhan Parishad Graduate Constituency Election)

भाजप महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर कात्रे यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली होती. म्हात्रे यांना पहिल्या पसंतीची १८ हजारांहून अधिक मते मिळाल्यानंतर त्यांचा विजय पक्का झाल्याचे समजले जात होते. त्यामुळे या निवडणूकीत भाजपचा हा पहिला विजय असून कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान नाशिक पदवीधरच्या जागेवर सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्या निवडणूकीची चर्चा राज्यभरात गाजली त्यामुळे या जागेवर देखील कोण विजयी होणार याकडे राज्यभरातून लक्ष लागले आहे.

नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा शुभांगी पाटील यांना पाठींबा असून सत्यजित तांबे अपक्ष उमेदवार आहेत. येथील मतमोजणी अद्याप पूर्ण झालेली नसली तरी मतदार संघात सत्यजित तांबे यांच्या विजयाचे फलक लागले आहेत. या फलकांवर बाळासाहेब थोरात यांचा देखील फोटो असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हे सुद्धा वाचा

जितेंद्र आव्हाडांना कधीही अटक होणार ; अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावले

मंत्र्यांचे चोचले पुरविण्यासाठी होणार १००० कोटींची उधळपट्टी !

BMC Budget 2023 : मुंबई महापालिकेच्या इतिहासात 38 वर्षांत प्रथमच प्रशासक मांडणार अंदाजपत्रक

अमरावतीच्या जागेवर देखील भाजप आणि काँग्रेसमध्ये तगडी लढत सुरू आहे. भाजपचे रणजित पाटील आणि काँग्रेसचे धीरज लिंगाडे यांच्यात जोरदार टक्कर सुरू आहे. तर औरंगाबादच्या जागेवर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये सामना सुरू आहे. राष्ट्रवादीचे विक्रम काळे आणि भाजपचे किरण पाटील यांच्यात लढत होत आहे. नागपूरमतदार संघात भाजपचे पुरस्कृत उमेदवार नागोराव गाणार आणि महाविकास आघाडीचे सुधाकर आडबाले यांच्यात लढत होत असून सध्या महाविकास आघाडीचे आडबाले आघाडीवर आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी