28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeलेखमैत्रेय दादाश्रीजी यांचे आवाहन : नि:स्वार्थ सेवेच्या, नव्या विचारांच्या सोबत चला, नवीन...

मैत्रेय दादाश्रीजी यांचे आवाहन : नि:स्वार्थ सेवेच्या, नव्या विचारांच्या सोबत चला, नवीन भारताचे निर्माण करू या!

राष्ट्राचा विकास हा तंत्रज्ञान, प्रगती आणि आर्थिक विकासाने मोजला जातो. मात्र आता आपण प्रगती आणि विकासाच्या परिभाषेत आपल्या सभोवती असणाऱ्या लोकांच्या जीवनाबद्दलची करुणा आणि सेवाभाव याला सुद्धा त्यामध्ये सामावून घेण्याची वेळ आली आहे. खरे तर आपण एक विश्व आहोत, परंतू अद्यापही आपण एक कुटुंब होऊ शकलो नाही. एकतेतूनच परम शांती आणि उन्नतीचा मार्ग आहे, याच नि:स्वार्थ सेवेच्या, नव्या विचारांच्या (new ideas) सोबत चला, मैत्रीबोध परिवाराबरोबर नवीन भारताचे (new India) निर्माण करू या, असे आवाहन मैत्रीबोध परिवार या सामाजिक आणि अध्यात्मिक संस्थेचे संस्थापक मैत्रेय दादाश्रीजी (Maitreya Dadashreeji) यांनी केले. (Maitreya Dadashreeji Appeal, Come along with selfless service, new ideas, let’s build a new India!)

२७ डिसेंबर हा दिवस मैत्रीबोध परिवारातर्फे नि:स्वार्थ सेवा दिवस म्हणून अतिशय उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो. कर्जत येथील शांतीक्षेत्र प्रेमगिरी आश्रमात आयोजित मैत्री महोत्सव आयोजित करण्यात आला होता. मैत्रेय दादाश्रीजींनी तेथे उपस्थितांना सेवेद्वारे उन्नतीचा मार्ग दाखवला.

यावेळी मार्गदर्शन करताना मैत्रेय दादाश्रीजी म्हणाले, ज्या तरुणपिढीची आपण घडण, पोषण करत आहोत त्या तरुणपिढीवर संपूर्ण देश आणि विश्वाचे भविष्य अवलंबून आहे. आज योग्य शिक्षण म्हणाल तर ज्या शिक्षणात वैदिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश आहे, तेच शिक्षण भविष्यासाठी योग्य अशी उत्तम युवा पिढी तयार करेल. आणि ती युवा पिढी करुणामयी, साहसी आणि दूरदर्शी असेल. मैत्रीबोध परिवार स्नेहसंस्कार गुरुकुल तेच लक्ष्य गाठण्यासाठी प्रयत्नशिल आहे. सध्या महाराष्ट्रातील कर्जतमध्ये, पंजाब मधील अमृतसर आणि लुधियानामध्ये आणि जम्मूमध्ये स्नेहसंस्कार गुरुकुल काम करत आहे. नुकतेच मैत्रेय दादाश्रीजींनी मैत्री संस्कार पुस्तकाचे प्रकाशन देखील केले आहे. त्या पुस्तकात आपल्या संस्कृतीची मुळ मुल्ये एकत्रित केली आहेत.

हे सुद्धा वाचा 

अधिकारी महासंघाला लाज का वाटत नाही? सरकारी कर्मचारी संघटनेचा संताप

‘स्किल इंडिया’ अंतर्गत देशातील तरुणांना प्रशिक्षणाची संधी

नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी नरेंद्र मोदींचा मोठा कार्यक्रम!

नि:स्वार्थ सेवेतून व्यक्त होणारी करुणामयी भावना फक्त मानवांपर्यंत सीमित नसते आणि नसावी देखील. जर आपण पाहिलं तर अनेक गायींचे जीवन सुद्धा दुःखयुक्त असते कारण अधिकांश गायींना प्रेम आणि करुणा मिळत नाही. जेव्हा त्या आजारी पडतात किंवा त्या कामाच्या राहत नाहीत तेव्हा त्यांना डेअरी, फार्म अशा ठिकाणांहून सोडून दिले जाते. अशा या गायींसाठी कामधेनु गोधाम निवासस्थान आहे. या ठिकाणी अशा गायींवर उपचार केले जातात, त्यांची सेवा केली जाते, पौष्टिक आहार देऊन त्यांना पुन्हा धष्टपुष्ट केले जाते. त्यामुळे विचार बदलले तर तुम्ही बदलाल, आणि तुम्ही बदलला तर देश बदलेल. त्यामुळे समाजाच्या प्रगतीमध्ये योगदान देण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करा, तसेच गायींची सेवा करा असे आवाहन देखील मैत्रीबोध परिवारातर्फे करण्यात आले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी