28 C
Mumbai
Monday, November 27, 2023
घरजागतिकहमास विरुद्ध इस्रायल युद्धात हमासची माघार? मृतांचा आकडा आला समोर

हमास विरुद्ध इस्रायल युद्धात हमासची माघार? मृतांचा आकडा आला समोर

रशिया – युक्रेन यांच्यातील युद्ध थांबले नसताना आता इस्रायल विरुद्ध हमास यांच्यात युद्ध सुरू झाले आहे. हे युद्ध शनिवारी झाले असून हमासने गाजा पट्टीवर 5 हजार रॉकेट्सचा हल्ला केला. यात इस्रायलचे असंख्य लोक मृत्यूमुखी पडली आहेत. एवढंच नाही तर काही तरुणींवर अन्याय अत्याचार केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले होते. अशातच आता युद्धाच्या तिसऱ्या दिवशीही अशीच परिस्थिती पहायला मिळाली आहे. यामुळे आता इस्रायलने आपले 3 लाख सैनिकांना युद्धासाठी पाठवलं आहे. यामुळे आता हमासची पळता भुई थोडी केल्याने हमासने युद्ध थांबवण्यासाठी इस्रायलकडे प्रस्ताव पाठवला आहे.

हे युद्ध 72 तास सुरू होते. यावर आता हमासचे ज्येष्ठ नेते मुसा अबू मारझूक म्हणाले की, आम्ही आमचे लक्ष्य गाठले गेले आहे. संभाव्य युद्धविरामावर आम्ही इस्रायलशी चर्चा करण्यास तयार आहोत. एवढंच नाही तर युद्धासंदर्भात पॉलिस्टीनी प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी संयुक्तराष्ट्र प्रमुख गुटरेस यांच्याशी चर्चा केली असून हमासने केलेला हल्ला अजूनही चालू आहे. यामुळे आता इस्रायल देखील हमासवर तुटून पडले आहे. हमासचे देखील अंदाजे 1300 लोकं मृत्यूमुखी पडले आहेत.

 

हेही वाचा 

मला मारू नका… इस्रायलच्या 25 वर्षीय मुलीचं हमासकडून अपहरण; व्हिडिओ आला समोर

इस्रायल-पॅलेस्टिनींमुळे जगावर युद्धाचे संकट, तर कॅनडा-इराणमध्ये जल्लोष

आरोग्य केंद्राला ‘सक्षमीकरणाचा डोस’ देण्याऐवजी खासगीकरणाचा सपाटा

इस्रायल मागे हटणार नाही

पॅलेस्टाईन प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी संयुक्त राष्ट्र प्रमुखांशी चर्चा केली. इस्रायलचे हल्ले थांबवावेत, अशी विनंती त्यांनी संयुक्त राष्ट्र प्रमुखांना केली आहे. तसेच इस्रायलवरील हमासच्या हल्ल्यासाठी अमेरिका इराणला जबाबदार धरत असल्याचे दिसत आहे. हमासने जरी युद्ध बंदीचा प्रस्ताव केला असला तरीही आता मात्र इस्रायल मागे हटणार नसल्याचे चित्र दिसू लागले आहे.

अभिनेता शाहरूख खानचा इस्रायलला पाठींबा ट्वीट करत दिली माहीती

जगभरातून अनेक देशातील जनतेने इस्रायलला पाठींबा दिला आहे. अनेकजन सोशल मीडियाच्या माध्यामातून हमासचा निषेध करत आहेत. एवढंच नाही तर आता बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरूख खानने देखील इस्रायलसोबत असल्याचे ट्वीट करत माहीती दिली आहे. त्याने इस्रायलला पूर्णपणे पाठींबा दिला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी