30 C
Mumbai
Tuesday, November 14, 2023
घरजागतिकहमास-इस्रायल युद्धाला विराम?

हमास-इस्रायल युद्धाला विराम?

हमास आणि इस्रायल यांच्यात २२ दिवसांनंतरही युद्ध सुरूच आहे. कोणी इस्रायलला पाठिंबा देत आहे. तर कोणी हमासला साथ देत आहे. या युद्धाची सुरूवात हमासने केली होती. सुरूवातीला हमासने इस्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्याने इस्रायलची परिस्थिती बिकट झाली होती. काही मुलींवर अन्याय अत्याचार करण्यात आले होते. यामुळे शांत असलेला इस्रायल आता पेटून उठला आहे. काही दिवसांपासून सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी हमासने इस्रायलला निवेदन दिले होते. मात्र आता इस्रायल शांत बसायचे नाव घेत नसून हमासवर हल्ला चढवत आहे.

हमास आणि इस्रायल या दोन्ही देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याने देशातील अनेक शहरांमधील वास्तु, इमारती, प्रेक्षणिय स्थळं जमीनदोस्त झाली आहेत. य़ुद्ध जरी हमासने सुरू केले असले तरीही संपवणार आम्हीच, असे इस्रायलच्या पंतप्रधानांनी सांगितले. मात्र आता हे युद्ध थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत युद्धाबाबतचा प्रस्ताव उपस्थित करण्यात आला. यासाठी अनेकांनी आपापले मत दिले आहे. मात्र भारताने या युद्धाबाबत आपले मत दिले नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता हे युद्ध असेच सुरू राहणार का? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. या दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता जगभर पाहायला मिळत आहेत.

भारतातील अनेक नागरिकांचा इस्रायलला पाठिंबा असून तालिबान हमासला पाठिंबा देत आहे. संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत युद्ध थांबवण्यासाठी प्रस्ताव मांडला असता भारताने याबाबत कोणतेही मत दिले नसून कारण आता समोर आले आहे. प्रस्तावात इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्याबाबतचा उल्लेख ठरावात नसल्याचे भारताने सांगितले आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्या योजना पटेल यांनी इस्रायलवरील झालेल्या हल्ल्यावर दुख व्यक्त केले. त्याचप्रमाणे तणाव कमी करण्यासाठी भारताचा पाठिंबा आहे, अशा योजना पटेल म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा

‘तो’ व्हिडीओ का टाकला? फडणवीसांकडून उत्तराला बगल

धर्मरावबाबा आत्रामांची जबराट मोहीम, अन्नात घाण करणाऱ्या ‘नासक्या आंब्यांना’ चुन चुनके…

मराठा आरक्षणावरून सातारा जिल्ह्यातील ‘या’ नेत्यांना गावबंदी

या देशांचे मत

बांगलादेश, मालदीव, पाकिस्तान, रशिया आणि दक्षिण आफ्रिकेसह ४० हून अधिक देशांनी याला अनुमोदन दिले. या ठरावावर मतदान झाल्यावर भारताने अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला.

भारतासह हे देश मतांपासून अलिप्त

भारताशिवाय कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, युक्रेन जपान आणि ब्रिटनने मतदानापासून अलिप्त राहिले. या प्रस्तावात हमास या दहशतवादी संघटनेचा उल्लेख नसल्याने अमेरिकेने नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, इस्रायल हमासवर घातक हल्ले करणार असल्याची माहिती समोर आली. यामुळे संयुक्त राष्ट्रांना हा मुद्दा सोडवणे कठीण होऊन बसले आहे.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी