29 C
Mumbai
Thursday, August 4, 2022
घरजागतिकअभिमानास्पद! 'इंटरनॅशनल मॅथेमेटिक ऑलिम्पियाड'मध्ये भारताने सुवर्णपदकासह कमावली पाच पदके

अभिमानास्पद! ‘इंटरनॅशनल मॅथेमेटिक ऑलिम्पियाड’मध्ये भारताने सुवर्णपदकासह कमावली पाच पदके

टीम लय भारी

नाॅर्वे : यंदाची इंटरनॅशनल मॅथेमेटिक ऑलिम्पियाड स्पर्धा नार्वे येथे 6 जुलै ते 16 जुलै 2022 या दरम्यान पार पडली. या स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत भारताने यावेळी सुवर्ण पदक जिंकून पाच कांस्यपदक कमावले आहेत.

या स्पर्धेत एकूण 104 देश सहभागी झाले होते, यामध्ये उत्तम चुणूक दाखवत भारताने 24 वा क्रमांकावर स्थान मिळवले आहे. बेंगळुरूमधील प्रांजल श्रीवास्तवने यंदा सुद्धा  इंटरनॅशनल मॅथेमेटिक ऑलिम्पियाडमधील सुवर्णपदकावर तिसऱ्यांदा नाव कोरले आहे. या स्पर्धेत सलग सुवर्णपदक जिंकणारी प्रांजल पहिली भारतीय ठरली आहे.

भारताला मिळालेल्या या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना टीआयएफआरने सोशल मीडियावर ट्वीट करीत अभिनंदन केले आहे. ट्विटमध्ये ते लिहितात, “हे सांगताना आनंद होत आहे की, आंतरराष्ट्रीय मॅथेमेटिक ऑलिम्पियाड 2022 मध्ये भारतानं एक सुवर्णपदक आणि पाच कास्यपदक जिंकली आहेत. प्रांजल, अरूण, आदित्य, अतुल, वेदांत आणि कौस्तव यांचं अभिनंदन! आंतरराष्ट्रीय मॅथेमेटिक ऑलिम्पियाडमध्ये प्रांजलनं सलग तिसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकून हॅट्रिक नोंदवली.”

लोकप्रिय परीक्षांमध्ये ऑलिम्पियाड परीक्षेची गणना करण्यात येते. विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक क्षमता आणि अनेक विषयांतील ज्ञानाचं मूल्यांकन करण्यासाठी हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे, ज्यामध्ये अनेक मुले उत्साहाने दरवर्षी आपला सहभाग नोंदवत असतात.

हे सुद्धा वाचा…

अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याने नेटकरी पुन्हा जोमात

सर्वांत धक्कादायक ! मोदी सरकारच्या काळात 4 लाख भारतीयांनी सोडले नागरिकत्व

‘शपथ पत्र’ लिहून सुद्धा शिवसैनिक पळाले शिंदे गटात

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!