23 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
Homeनिवडणूक“जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना” मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने छगन भुजबळांचे...

“जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना” मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने छगन भुजबळांचे सूचक वक्तव्य

मला डावलले काय आणि फेकले काय? काही फरक पडत नाही. मंत्रिपद किती वेळा आले आणि गेले. पण भुजबळ काही संपले नाही.

नुकताच महायुती सरकारचा झालेला मंत्रिमंडळाचा विस्तार आणि महाराष्ट्रात सुरु असलेलं राजकारण चांगलंच चर्चेत आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना देवेंद्र फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळात स्थान दिले नाही.त्यामुळे भुजबळांच्या समर्थकांना धक्का बसला असून पक्षातील वरिष्ठांनी व महायुतीच्या नेत्यांनी मंत्रिपदापासून वंचित ठेवल्यामुळे छगन भुजबळ देखील नाराज असल्याचे दिसत आहेत. आपली नाराजी माध्यमांसमोर व्यक्त करत असताना त्यांना पुढच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आले. त्यावेळी छगन भुजबळांनी एक सूचक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलेले दिसून येत आहेत. (Chhagan Bhujbal’s indicative statement for not being given a place in the cabinet)

तुम्ही आता नागपूरमधील विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होणार नाही का? असा प्रश्न छगन भुजबळांना विचारला असता ते म्हणाले “आता बघू… जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना”. असं म्हणत मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलले काय आणि फेकले काय? काही फरक पडत नाही. मंत्रिपद किती वेळा आले आणि गेले. पण भुजबळ काही संपले नाही, असे वक्तव्य करत त्यांनी पक्षश्रेष्ठींना इशारा दिला. (Chhagan Bhujbal’s indicative statement for not being given a place in the cabinet)

त्यानंतर भुजबळ म्हणाले कि, “मंत्रिमंडळातून मला का काढलं याबाबत मला माहिती नाही. परंतु, माझं वरिष्ठांशी सात-आठ दिवसांपूर्वी बोलणं झालं होतं. त्यावेळी ते मला म्हणाले, तुम्हाला राज्यसभेवर जायचं असेल तर आम्ही तुम्हाला राज्यसभेवर पाठवू. त्यावेळी मी त्यांना म्हणालो, जेव्हा मला राज्यसभेवर जायचं होतं तेव्हा तुम्ही मला ती संधी दिली नाही. तेव्हा तुम्ही मला सांगितलं की विधानसभेची निवडणूक लढवा. तुम्ही विधानसभा निवडणूक लढवलीच पाहिजे. तुमच्याशिवाय येवला मतदारसंघाची निवडणूक जिंकता येणार नाही. त्यामुळे तुम्ही लढलंच पाहिजे, असं मला सांगितलं गेलं. तुमच्या त्या सल्ल्यानंतर मी विधानसभा निवडणूक लढवली. येवल्यातील जनतेने मला निवडूनही दिलं. आता मी तुमच्या सांगण्यावरून आमदारकीचा राजीनामा देऊ शकत नाही. तसं केल्यास माझ्या मतदारसंघातील जनतेसोबत विश्वास घात केल्यासारखे होईल.(Chhagan Bhujbal’s indicative statement for not being given a place in the cabinet)

वरिष्ठांच्या ऑफर संधर्भात विचारल्यावर भुजबळ काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले, “राज्यसभेवर जाण्यासाठी मला विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल आणि मी तसं केलं तर माझ्या लोकांसाठी ते दुःखदायक असेल. माझे मतदार रागावणार नाहीत, परंतु निश्चितपणे त्यांच्या मतांची प्रतारणा होईल, जे मी करू शकत नाही. ज्या लोकांनी माझ्यावर जीवापाड प्रेम केलं त्यांच्याशी मी असं वागणार नाही. आठ दिवसांपूर्वी माझ्या वरिष्ठांनी मला की ऑफर दिली होती. परंतु, मी त्यांना स्पष्टपणे नकार कळवला आहे. मी आमदारकीचा राजीनामा देऊ शकत नाही, असं त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे. कारण माझा राजीनामा देणं म्हणजे मतदारांचा विश्वासघात ठरेल. त्यामुळे मी सध्या तरी राजीनामा देणार नाही. एक दोन वर्षांनी त्याबाबत विचार करू.(Chhagan Bhujbal’s indicative statement for not being given a place in the cabinet)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी