28 C
Mumbai
Tuesday, September 12, 2023
घरनिवडणूककर्नाटक : 12 पैकी आठव्या फेरीअखेर काँग्रेस 119; स्पष्ट बहुमत!

कर्नाटक : 12 पैकी आठव्या फेरीअखेर काँग्रेस 119; स्पष्ट बहुमत!

सकाळी 11:15 वाजता - 224 पैकी काँग्रेस 119, भाजप 70, जनता दल 28, अपक्ष व इतर 7; एकूण 10 जागी सध्या आघाडी अंतर हे 500 जागांपेक्षा कमी आहे, भाजप, जनता दल आणि अपक्ष व इतर मिळूनही काँग्रेसच्या जागांची बरोबरी करू शकत नाही, असे चित्र आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालात काँग्रेस आघाडीवर आहे. मतमोजणीच्या 12 पैकी आठव्या फेरीअखेर काँग्रेसने स्पष्ट बहुमत गाठले आहे. याक्षणी, 224 जागांच्या कलात काँग्रेस 119 जागी आघाडीवर आहे. भाजप 70 तर जनता दल 28 जागी आघाडीवर दिसत आहे. अपक्ष वा इतरांच्या खात्यात 7 जागा जाताना दिसत आहेत. सध्या अनेक ठिकाणी सातव्या आणि आठव्या फेरीची मतमोजणी सुरू आहे. त्यामुळे ही निम्म्याहून जास्त मतमोजणी पूर्ण झाल्याची स्थिती आहे. कर्नाटकात सरकार स्थापनेसाठी 113 जागांची आवश्यकता आहे.

10हून जास्त ठिकाणी सध्या आघाडी ही 500 पेक्षा कमी मतांची आहे. त्यामुळे ही स्थिती कदाचित बदलू शकेल. अर्थात सध्या भाजप, जनाता दल आणि अपक्ष व इतर हे तिघे मिळूनही काँग्रेसपेक्षा जागांपर्यंत बरोबरी करू शकत नाहीत.

कर्नाटक निवडणूक निकाल 2023 मध्ये भाजप, काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत आहे. काँग्रेस आघाडीवर असताना प्रियंका गांधींनी हनुमान मंदिरात प्रार्थना केली आहे. बसवराज बोम्मई, सिद्धरामय्या, डीके शिवकुमार, एचडी कुमारस्वामी आणि इतर अनेकांसह पक्षाच्या नेत्याचे निवडणुकीतील भवितव्य आज सर्वांना ज्ञात होईल.

कर्नाटक निवडणुकीच्या निकालांचे सुरुवातीचे ट्रेंड काँग्रेस आणि भाजप यांच्यात अत्यंत निकराची लढत सूचित करत आहेत . सकाळी 8 वाजता सुरू झालेली मतमोजणी काँग्रेस, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) या तीन पक्षांचे भवितव्य ठरवेल. 224 सदस्यांच्या विधानसभेत जादूई आकडा 113 आहे. बहुतेक एक्झिट पोलमध्ये निकराची लढत आणि त्रिशंकू विधानसभा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. उल्लेखनीय म्हणजे, कर्नाटकात 1985 पासून सत्तेत आलेले सरकार कधीही पुन्हा राज्यात सत्तेत आलेले नाही.

याक्षणी, सकाळी 11 वाजता एबीपी न्यूज नुसार,  काँग्रेस 112 जागांवर आघाडीवर आहे, भाजप 80 जागांवर आणि जेडीएस 25 जागांवर आघाडीवर आहे.

आजतकच्या रिपोर्टनुसार, भाजप 79 जागांवर, काँग्रेस 116 जागांवर आणि जेडीएस 24 जागांवर आघाडीवर आहे.

टाईम्स नाऊ नुसार, भाजप 81 जागांवर, काँग्रेस 115 जागांवर आणि जेडीएस 24 जागांवर आघाडीवर आहे.

रिपब्लिक टीव्ही वृत्तानुसार, भाजप 78 जागांवर, काँग्रेस 114 जागांवर, जेडीएस 27 जागांवर आघाडीवर आहे.

Congress Winning Karnataka0, Karnataka Assembly Election, Karnataka Assembly Election 2023, Rahul Gandhi Beating Narendra Modi, Karnataka Election

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी