29 C
Mumbai
Friday, March 17, 2023
घरनिवडणूकनागपुर पदवीधरमध्ये भाजपची धुळदान; मविआचे सुधाकर आडबोले यांचा दणदणीत विजय

नागपुर पदवीधरमध्ये भाजपची धुळदान; मविआचे सुधाकर आडबोले यांचा दणदणीत विजय

विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या पाच जागांसाठी आज मतमजोणी होत असून नागपुर पदवीधर मतदार संघातून (Vidhana Parishad Nagpur Graduate Constituency election) महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबोले (Sudhakar Adbole) यांनी भाजप समर्थित उमेदवार नागो गाणार यांचा पराभव केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात भाजप समर्थित उमेदवार पडल्याने हा त्यांच्यासाठी धक्का मानला जात आहे. (Vidhana Parishad Nagpur Graduate Constituency election, Maviya’s candidate Sudhakar Adbole won)

विधान परिषदेच्या कोकण, अमरावती, औरंगाबाद, नागुर आणि नाशिक या पाच पाच पदवीधर मतदार संघासाठी ३० जानेवारी रोजी मतदान पार पडले, आज या मतदार संघाच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. पहिल्यांचा कोकण मतदार संघातील निकाल हाती आला यामध्ये भाजप- शिंदे गट आणि मित्रपक्षाचे ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी मविआचा सहकारी पक्ष शेकापचे बाळाराम पाटील यांचा मोठ्या मताधक्क्याने पराभव केला.

हे सुद्धा वाचा

आमदार कपिल पाटील यांचाही पराभव करणार, भाजपचा इशारा

विधान परिषद पदवीधर निवडणूकीत भाजपने खाते उघडले; कोकणात ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका; संभाजी भिडेंचे वादग्रस्त विधान

त्यानंतर दुसरा नागपुर मतदार संघाचा निकाल हाती आला असून या मतदार संघात मात्र मविआने भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यातच धोबीपछाड दिली आहे. सुधाकर आडबोले यांनी नागो गाणार यांचा पराभव केला आहे. नागपूर पदवीधरमध्ये 22 उमेदवार रिंगणार होते.

दरम्यान नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची सुरस वाढली असून नाशिकमध्ये पहिल्या फेरीत सत्यजित तांबे हे आघाडीवर आहेत. तर मविआच्या शुभांगी पाटील पिछाडीवर आहेत. नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागून राहिले असून अद्याप या मतदार संघाचा निकाल हाती आलेला नाही. मात्र निकाला आधीच सत्यजित तांवे यांच्या विजयी शुभेच्छांबद्दलच्या पोस्टरमुळे जोरदार चर्चा झाली होती.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी