27 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरशिक्षण10वी 12वीच्या परिक्षांबाबत मोठा निर्णय; वाचा सविस्तर

10वी 12वीच्या परिक्षांबाबत मोठा निर्णय; वाचा सविस्तर

कोरोनाकाळात विद्यार्थ्यांना देण्यात आलेली होमसेंटर सुविधा आणि पेपर लिहिण्यासाठी दिलेला अर्धा तासाचा वाढीव वेळ आता रद्द.

2023 मध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या आगामी परीक्षांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत, असे औरंगाबाद विभागीय शिक्षण मंडळाने सांगितल आहे. कोरोनाकाळात विद्यार्थ्यांना देण्यात आलेली होमसेंटर सुविधा आणि पेपर लिहिण्यासाठी दिलेला अर्धा तासाचा वाढीव वेळ रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती विभागीय शिक्षण मंडळाचे सहसचिव वाय. एस. दाभाडे यांनी दिली आहे.

कोरोनाकाळातील परीक्षा नियमांमध्ये बदल

कोरोनाकाळातील परीक्षा नियमांमध्ये बदल 2023 मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी होम सेंटर असणार नाही, या वेळी 80 गुणांच्या पेपरसाठी दिलेला वाढीव अर्धा तास मिळणार नाही. सन 2023 मध्ये संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होईल. विद्यार्थ्यांना परीक्षेत 60 ते 40 गुणांसाठी मिळत असलेली अधिकची पंधरा मिनिटांची सवलत यंदा होणाऱ्या परीक्षेत मिळणार नाही. कोरोनाकाळात परीक्षेमधील 25% अभ्यासक्रम वगळला होता, मात्र यंदा शंभर टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होणार आहे. दिव्यांगांना मिळणाऱ्या सर्व सवलती मात्र कायम राहणार आहे.

या कारणामुळे घेतले होते निर्णय
विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने कोरोनाकाळा मध्ये झालेल्या फेब्रुवारी-मार्च महिन्यातील दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना काहीप्रमाणात दिलासा देण्यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आले होते. मात्र आता कोरोना परिस्थिती आटोक्यात असल्याने आगामी दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी कोरोनाकाळात लावण्यात आलेले निर्णय शिक्षण मंडळाद्वारे रद्द करण्यात आले आहे. ज्यामध्ये परीक्षा देण्यासाठी होम सेंटर देण्याचा निर्णय सुद्धा घेतला गेला होता आणि सोबतच 80 गुणांच्या पेपरसाठी वाढीव अर्धा तास देखील देण्यात आला होता.

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी घेतलेला निर्णय ठरला गैरसोयीचा
गेल्यावर्षी देशात कोरोना बाधितांची वाढती संख्या आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता दहावी-बारावी परीक्षेसाठी गेल्यावर्षी होम सेंटरचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांचा गैरफायदा घेत अनेक ठिकाणी परीक्षेत ‘कॉपी’चे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळाले. औरंगाबादच्या एका ग्रामीण भागातील शाळेत तर चक्क शाळेतील शिक्षकांकडूनच विद्यार्थ्यांना चिठ्ठ्या पुरवल्या जात असल्याचा व्हिडिओ देखील सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात वायरल झाला होता. या गोष्टीची दखल घेत शिक्षण मंत्र्यांनी संबधीत शाळेची मान्यता देखाल रद्द केली होती. तर अनेक ठिकाणी शाळांमध्ये परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांची गैरसोय झाल्याचे दिसून आले.

हे सुद्धा वाचा

Video : जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थनात उभ्या राहिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या

Video : IAS घडविण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्याचा दणकट उपक्रम

Jitendra Awhad : ‘राजकारण आम्हीही केलं पण…’ विनयभंगाचा आरोप जितेंद्र आव्हाडांच्या जिव्हारी

 

या आहेत अर्ज भरण्याच्या तारखा
सन 2023 मध्ये होणाऱ्या दहावी-बारावी परीक्षेसाठी सद्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून बारावीचे अर्ज भरण्यासाठी 15 नोव्हेंबर पर्यंतची मुदत आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत एक लाख 48 हजार 636 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. तर दहावीसाठी 25 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असून आत्तापर्यंत 95 हजार 682 विद्यार्थ्यांनी अर्ज भरल्याची माहिती विभागीय शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी