23 C
Mumbai
Thursday, January 16, 2025
Homeशिक्षणNTA ने घेतला मोठा निर्णय: आता केवळ उच्च शिक्षण संस्थांसाठी NTA ...

NTA ने घेतला मोठा निर्णय: आता केवळ उच्च शिक्षण संस्थांसाठी NTA घेणार प्रवेश परीक्षा; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांची माहिती

नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात NTA नव्या वर्षापासून कोणतीही भरती परीक्षा घेणार नाही. JEE Main, NEET, CUET आणि UGC NET या महत्त्वाच्या परीक्षा घेणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे. हि एजन्सी आता केवळ उच्च शिक्षण प्रवेश परीक्षांवर लक्ष केंद्रित करेल असे म्हणत, येत्या काळात कम्प्यूटर बेस्ड परीक्षा आणि टेक्नोलॉजी बेस्ड प्रवेश परीक्षेवर लक्ष केंद्रीत करायचे आहे.अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रथान यांनी दिली आहे. (Now NTA will conduct entrance exam only for higher education institutes; Information from the Union Education Minister)

 

2025 मध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सी ची पुनर्रचना करण्यातयेणार आहे. ज्यासाठी 10 नवीन पदे निर्माण केली जातील, तसेच, NEET-UG परीक्षा “पेन -अँड -पेपर” पद्धतीने किंवा ऑनलाइन पद्धतीने घ्यायची याबाबत आरोग्य मंत्रालयाशी चर्चा सुरु असल्याचे प्रधान यांनी सांगितले. देशात नवीन वर्षापासून बोर्डाच्या परीक्षांचा हंगाम सुरु होणार आहे. बोर्डाच्या परीक्षेचा हंगाम म्हणजे तणावाचा हंगाम. हा ताण कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी परीक्षा पे चर्चा कार्यक्रम आयोजित केला जातो, असेही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रथान यांनी म्हंटले आहे. (Now NTA will conduct entrance exam only for higher education institutes; Information from the Union Education Minister)

 

पुढे पत्रकार परिषदेमध्ये प्रधान यांनी सांगितले की, “NTA मध्ये सुधारणा करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीचा अहवाल आला आहे. कारवाईच्या अहवालाचा भाग म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयाला तो दिला आहे. हा अहवाल आजच सार्वजनिक होईल.(Now NTA will conduct entrance exam only for higher education institutes; Information from the Union Education Minister)

 

त्याचसोबत “NTA सध्या भरती परीक्षांसह विविध प्रकारच्या परीक्षा आयोजित करते. मात्र आता NTA विद्यापीठे आणि महाविद्यालयीन प्रवेश परीक्षा आयोजित करेल. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुलभ आणि अधिक कार्यक्षम प्रक्रिया सुनिश्चित करणे हा या बदलाचा उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. (Now NTA will conduct entrance exam only for higher education institutes; Information from the Union Education Minister)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी