32 C
Mumbai
Monday, March 17, 2025
Homeशिक्षणSSC Result नंतर Polytechnic प्रवेश प्रक्रियेला सुरूवात | विनोद मोहितकर यांची खास...

SSC Result नंतर Polytechnic प्रवेश प्रक्रियेला सुरूवात | विनोद मोहितकर यांची खास मुलाखत | भाग १ |

दहावीचा नुकताच निकाल लागला आहे.महाराष्ट्र सरकारच्या तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने पदविका अभियांत्रिकीचे प्रवेश सुरू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक विनोद मोहितकर यांची 'लय भारी'चे संपादक तुषार खरात यांनी खास मुलाखत घेतली.

दहावीचा नुकताच निकाल लागला आहे(Polytechnic admission process starts after SSC Result Exclusive interview with Vinod Mohitkar). विद्यार्थी व पालकांची पुढील प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. अकरावीच्या विविध शाखांसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांची धडपड सुरू आहे, तशी पदविका अभियांत्रिकी, म्हणजेच पॉलिटेक्नीक अभ्यासक्रमांसाठी सुद्धा विद्यार्थ्यांची मोठी मागणी आहे. महाराष्ट्र सरकारच्या तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने पदविका अभियांत्रिकीचे प्रवेश सुरू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक विनोद मोहितकर यांची ‘लय भारी’चे संपादक तुषार खरात यांनी खास मुलाखत घेतली. महाराष्ट्रात सरकारी, खासगी अनुदानित व खासगी विनाअनुदानित पॉलिटेक्निकि संस्थांमध्ये कशा प्रकार प्रवेश प्रक्रिया राबविली जाते, याची इत्यंभूत माहिती मोहितकर यांनी यावेळी दिली. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नोंदणी प्रक्रियेला सुरूवात करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांसाठी सुविधा केंद्रांचीही तरतूद करण्यात आलेली आलेली आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज कसे भरायचे, कोणकोणती कागदपत्रे सादर करायची याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले जात आहे, असे विनोद मोहितकर यांनी सांगितले. पॉलिटेक्निकचे प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला हमखास नोकरी मिळते. एवढेच नव्हे तर अनेकजण उद्योजक झालेले आहेत. पॉलिटेक्निकमध्ये केवळ वर्ग, वह्या व पुस्तके याच्या पलिकडे जाऊन उद्योग क्षेत्रात काय करायचे आहे, याचे प्रात्यक्षिक दिले जाते. त्यामुळे विद्यार्थ्याकडे चांगली कौशल्य आत्मसात होतात, असेही मोहितकर यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी