30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeजागतिक’या‘ कंपन्यांनी उचलले कामगार कपातीचे पाऊल

’या‘ कंपन्यांनी उचलले कामगार कपातीचे पाऊल

टीम लय भारी

नवी दिल्ली: जागतिक महामंदीची नांदी सुरु झाली आहे. त्याचा मोठा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजार घरतांना दिसत आहे. महामंदीच्या टांगत्या तलावरीमुळे  दिग्गज कंपन्यांनी कर्मचारी कपातीला सुरुवात केली आहे. तर अनेकांनी नवी भरती थांबवली आहे. अमेझाॅन, अँपल, फेसबुक, मायक्रोसाॅफ्ट, नेटफ्लिक्स आणि टेस्लासह जगातील काही कंपन्यांनी नोकर भरती थांबवली आहे.

जगप्रसिध्द उदयोग पती एलन मस्क यांनी जागतिक महामंदीवर मात करण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रमाणेच जगभरातील मोठया कंपन्यांनी देखील जागतिक महामंदीचा फटका बसून नये म्हणून कामगार कपात करण्यास सुरुवात केली आहे.’टेस्ला’ ही ’एलन मस्क‘ यांच्या मालकीची कंपनी आहे. ‘टेस्ला’ने जून महिन्यात ‘कॅलिफोर्निया’ येथील एक कंपनी बंद केली. त्यामुळे 200 कामगारांवर बेरोजगाराची वेळ आला आहे. पुढील तीन महिन्यांत 10 टक्के कामगारांची नोकरी जाण्याची शक्यता आहे.

तसेच इतर ‘टेक’ कंपन्यांमध्ये देखील कामगार कपात होण्याची दाट शक्यता आहे. ‘व्टिटर’ने मे महिन्यांपासून नोकर भरती थांबवली आहे. ऑनलाईन  फर्निचर रिटेल वेफयर इंक, युनिटी सॉफ्टवेअर कंपनीने 4 टक्के कामगारांना कामावरुन काढून टाकले आहे. स्पाॅटिफायने 25 टक्के तर निटनटीक कंपनीने जून महिन्यात 8 टक्के कर्मचारी कमी केले.गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी नवीन नोकर भरती कमी केली आहे. गुगलकडे आता 1 लाख 64 हजार कर्मचारी आहेत.

तर सर्वात जास्त काम देणारी कंपनी ही ‘अमेझाॅन’ आहे. कंपनीचे म्हणणे आहे. आमच्याकडे गरजेपेक्षा जास्त कर्मचारी आहेत. त्यांचा खर्च भागविण्यासाठी कंपनीने काही गोदाम भाडयाने दिले आहेत. तर अपल कंपनीने मंदीचा समाना करण्यासाठी नव्याने भरती कमी केली आहे. तर फेसबुकची मुख्य कंपनी असलेल्या ‘मेटा’ने इंजिनिअरिंग भरती 30 टक्क्यांनी कमी केली आहे. कंपनीचे सीईओ ‘मार्क झुकरबर्ग’ यांनी सांगितले आहे. की इतिहासातील सर्वांत वाईट आर्थिक संकटाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा. तर मायक्रोसाॅफ्ट कंपनीने विंडोज, आफिस, टीम ग्रुप्समध्ये देखील नव्याने भर्ती होणार नसल्याचे मे महिन्यांतच सांगितले होते. तर ‘नेटफ्लिक्स’ कंपनीने मे महिन्यात 150 जणांना तर जूनमध्ये 300 जणांना कामावरुन कमी केले.

हे सुध्दा वाचा:

शिंदे-फडणवीस सरकारने ‘डिसले गुरुजीं’चा राजीनामा नामंजूर केला

चक्क ‘वाघोबां’साठी वाहतूक थांबवली

निष्ठा यात्रेनंतर शिवसेनेला भिवंडीत बसला धक्का

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी