28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeशिक्षणऐकावे ते नवलच, नापास केले म्हणून विद्यार्थ्यांनी मास्तरांनाच धुतले

ऐकावे ते नवलच, नापास केले म्हणून विद्यार्थ्यांनी मास्तरांनाच धुतले

भारतात काय तर संपूर्ण जगामध्ये शिक्षकांना आणि शिक्षकी व्यवसायाला अनेक युगांपासून आदराचे स्थान दिले जात आले आहे. परंतु अलीकडेच झारखंड (Jharkhand) राज्याच्या डुमका जिल्हयात एक आगळी वेगळी घटना घटली. तेथील स्थानिक सरकारी शाळेच्या काही विदयर्थांनी त्या शाळेत शिकविणाऱ्या एका गणिताच्या शिक्षकाला आणि लिपीकाला झाडाला रश्शीने बांधून चक्क दांडयानी बदडून काढले.

भारतात काय तर संपूर्ण जगामध्ये शिक्षकांना आणि शिक्षकी व्यवसायाला अनेक युगांपासून आदराचे स्थान दिले जात आले आहे. परंतु अलीकडेच झारखंड (Jharkhand) राज्याच्या डुमका जिल्हयात एक आगळी वेगळी घटना घटली. तेथील स्थानिक सरकारी शाळेच्या काही विदयर्थांनी त्या शाळेत शिकविणाऱ्या एका गणिताच्या शिक्षकाला आणि लिपीकाला झाडाला रश्शीने बांधून चक्क दांडयानी बदडून काढले. इतकेच नाही तर त्यातील काही विद्यार्थ्यांनी या घटनेचा व्हिडिओ सुद्धा चित्रित करत होते. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर तुफान वायरल होत आहे. तर मुद्दा असा आहे की, इयत्ता नववीच्या ३२ पैकी ११ विद्यार्थ्यांना त्या गणिताच्या शिक्षकाने प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये ‘डी’ ग्रेड दिला ज्याचा अर्थ परीक्षेमध्ये नापास असा झाला या गोष्टीचा राग मनामध्ये धरून त्या विद्यार्थ्यांनी हे कृत्य केल्याचे समजते.

हे सुद्धा वाचा

शिवसेना – शिंदे गटात राडा

Sharad Pawar : एकनाथ शिंदेंची चूक सुधारण्यासाठी शरद पवारांची उद्या बैठक !

Modi government : मोदी सरकारला टक्कर देण्यासाठी शरद पवार, नितीश कुमार नवीन व्युहरचना आखणार

हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण तेथील स्थानिक पोलिस प्रशासनापर्यंत गेले आहे. याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, शाळा व्यवस्थापनाने झालेल्या प्रकाराबद्दल विद्यार्थ्यांविरूद्ध कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यास नकार दिला. शाळा व्यवस्थापनाकडून असे सांगण्यात आले की, जर आम्ही या विद्यार्थ्यांविरूद्ध तक्रार दाखल गेली तर पुढे त्यांच्या करियर मध्ये अडचण येण्याची शक्यता आहे. मारहाण झालेले शिक्षक सुमन कुमार आणि लिपीक सोनेराम चौरे यांनी सुद्धा त्या विद्यार्थ्यांविरूद्ध तक्रार करण्यास नकार दिला.

 

पोलिसांनी पुढे सांगितले की, ते या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ते शाळेत गेले होते तेव्हा त्यांना असे आढळले की त्या वसतिगृहातील शाळेत जवळपास २०० मुले शिक्षण घेतात त्यापेकी बहुतांश विद्यार्थी झालेल्या प्रकारात सामिल होते.

विद्यार्थ्यांनी असा आरोप केला की, त्या शिक्षकांनी त्यांना प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये अतिशय कमी गुण दिल्याने ते गणित विषयाच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आणि त्या लिपीकाने त्यांचा निकाल झारखंड शिक्षण खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्याने आम्ही दोघांना मारहाण केली.

या संपूर्ण प्रकारानंतर शाळा व्यवस्थापनाने इयत्ता ९ वी आणि १० वी च्या विद्यार्थ्यांचे वर्ग दोन दिवसांसाठी रद्द करून त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यात आले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी