34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराष्ट्रीयबापरे ! 100 वर्षे जूनी चूल, 500 आचारी, 56 भोग, मातीच्या भांडयात...

बापरे ! 100 वर्षे जूनी चूल, 500 आचारी, 56 भोग, मातीच्या भांडयात बनते जेवण

टीम लय भारी

जगन्नाथ पुरी:आज भारतीतील सर्वांत जूनी आणि सुप्रसिध्द जगन्नाथ पुरीची यात्रा सुरु झाली आहे. भगवान जगन्नाथ रथयात्रेसाठी भारतभरातून लाखोंच्या संख्येने नागरीक हजेरी लावतात. जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेचे एक वैशिष्य आहे ते, म्हणजे तथे मिळणारा प्रसाद होय.यात्रा काळात लाखो लोकांना प्रसादाचे वाटप केले जाते.लाखो लोकांचे जेवण बनविण्यासाठी सुमारे 500 आचारी काम करतात. भगवान जगन्नाथांना सहा वेळा भोग दाखवला जातो. 56 प्रकारच्या पदार्थांचा भोग दाखवला जातो. भोग दाखवल्यानंतर हा प्रसाद मंदिराच्या परिसरातील आनंद बाजारमध्ये विकला जातो.

जगन्नाथ मंदिरचे स्वयंपाक घर 11 व्या शतकातले असून, राजा इंद्रवर्माने ते बांधले आहे. त्यानंतर दुसरे स्वयंपाक घर 1682 ते 1713 च्या दरम्यान राजा दिव्य सिंहदेवने बनवली.या ठिकाणी काही आचारी पिढयान पिढया जेवण बनविण्याचे काम करत आहेत. महाप्रसाद बनविण्यासाठी मातीच्या भांडयांचा वापर केला जातो. गोड पदार्थ गुळापासून बनविले जातात. कोराना महामारीच्या काळात दोन वर्षे ही यात्रा बंद होती. यावर्षी यात्रेकरुंचा उत्साह ओसंडून वाहत आहे.

हे सुध्दा वाचा:

आता ‘आरे‘ला ‘कारे‘ होणारच

बंडखोरीचे राजकारण! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लावारीस गटाचे पालकत्व कोणाकडे?

हो ! राजकारणात काहीही घडू शकतं

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी