26 C
Mumbai
Saturday, September 28, 2024
Homeमुंबईमंत्री बाळासाहेब थोरात यांची अधिकाऱ्यांना सुचना, भाजपने लोकहिताच्या योजना बंद पाडल्या; त्या...

मंत्री बाळासाहेब थोरात यांची अधिकाऱ्यांना सुचना, भाजपने लोकहिताच्या योजना बंद पाडल्या; त्या आता परत सुरू करा

टीम लय भारी

मुंबई : राज्याचे महसूल मंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांनी दोन महिन्यांपूर्वी सूत्रे हाती घेतली. पण पाच वर्षांपूर्वी काँग्रेस – राष्ट्रवादी सरकारच्या काळातही त्यांनी महसूल मंत्री म्हणून काम केले होते. तेव्हा सुमारे तीन वर्षे महसूलमंत्री म्हणून ते कार्यरत होते. गाव खेड्यातील लोकांचे तहसिल – जिल्हा कार्यालयातील हेलपाटे कमी व्हावेत म्हणून थोरात यांनी तेव्हा अनेक कल्पक योजना राबविल्या होत्या. ‘पण मधल्या भाजप सरकारच्या काळात या लोकहिताच्या योजना बंद पडल्या. या योजना परत सुरू करा’ अशा सुचना थोरात यांनी महसूल अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

बाळासाहेब थोरात यांनी महसूल विभागाचा नुकताच आढावा घेतला. यावेळी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, जमाबंदी आयुक्त चोकलिंगम यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. पाच वर्षांपूर्वी महाराजस्व अभियान, चावडी वाचन असे उपक्रम थोरात यांनी सुरू केले होते. हे उपक्रम आता व्यवस्थित चालू नसल्याची खंत थोरात यांनी यावेळी व्यक्त केली.

मंत्री बाळासाहेब थोरात यांची अधिकाऱ्यांना सुचना, भाजपने लोकहिताच्या योजना बंद पाडल्या; त्या आता परत सुरू करा
जाहिरात

चोकलिंगम यांनी ऑनलाईन उपक्रमांबाबतचे एक सादरीकरण यावेळी सादर केले. त्या अनुषंगाने ई – सातबारा, ई – फेरफार, ई – नकाशे, ई – अभिलेख असे उपक्रम आणखी प्रभावीपणे राबविण्याबाबत यावेळी चर्चा झाली. ड्रोनद्वारे गावठाणाची पाहणी करून हद्दी निश्चित करण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचनाही बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केली. ‘ई – पीकपाणी’ हा नवा उपक्रम सुरू करण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला. राज्यातील सहा तालुक्यांमध्ये पथदर्शी स्वरूपात हा उपक्रम सुरू करण्याचे निश्चित केले आहे.

डिजिटल तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा. त्यातून सामान्य लोकांचा त्रास कमी होईल व भ्रष्टाचारालाही आळा बसेल असा आशावादही थोरात यांनी या बैठकीत व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

गाऱ्हाणे मांडणाऱ्या महिलांविषयी बाळासाहेब थोरातांनी दाखविली कणव, अधिकाऱ्यांना लावले कामाला

बाळासाहेब थोरांताचा टोला : भाजपने कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना रांगेत उभे केले होते, आम्ही मात्र सन्मानाने कर्जमाफी देणार

अण्णा हजारेंमुळे राजकीय करिअर उद्ध्वस्त झालेल्या ‘या’ नेत्याचे मंत्रीमंडळात होणार पुनरागमन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी