30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रSuper EXCLUSIVE : फुटलेल्या गटातील 22 आमदारांना मिळणार मंत्रीपदे, 36 आमदार फुटले...

Super EXCLUSIVE : फुटलेल्या गटातील 22 आमदारांना मिळणार मंत्रीपदे, 36 आमदार फुटले !

टीम लय भारी

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्याबरोबर तूर्त २२ आमदार सुरतमध्ये गेलेले आहेत. प्रत्यक्षात मात्र भाजपने ३६ आमदार फोडलेले आहेत. त्यापैकी २२ जणांना नव्या सरकारमध्ये मंत्रीपदे दिली जाणार असल्याची अत्यंत खात्रीलायक माहिती ‘लय भारी’च्या हाती आली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षापूर्वी अजित पवार यांना सोबत घेऊन पहाटेची शपथ घेतली होती. पण भाजपची ती योजना फसली होती. यावेळी मात्र योजना फसणार नाही, याची पुरेपुर काळजी भाजपने घेतलेली आहे.

एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद दिले जाणार आहेच, पण इतर २२ आमदारांनाही मंत्रीपदे दिली जाणार आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून फुटलेल्या आमदारांना परत बोलविण्यासाठी कितीही भावनिक व डावपेचात्मक प्रयत्न केले गेले तरी ते यशस्वी होणार नाहीत याची काळजी देवेंद्र फडणवीस आणि टीमने घेतली आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला सुरूंग लावला आहे. त्यामुळे भाजपला मोठी लॉटरी लागली आहे. ठाकरे सरकार कोसळण्याची चिन्हे आता स्पष्ट दिसत आहेत. अमित शाह स्वतः एकनाथ शिंदे व त्यांच्याबरोबरच्या आमदारांसोबत बोलणी करणार आहेत. एकनाथ शिंदे थेट भाजपमध्ये प्रवेश करणार की, स्वतंत्र गटाच्या मार्फत नवीन पक्ष स्थापन करणार याबाबतही राजकीय क्षेत्रात उलटसूलट चर्चा सुरू आहे.

दरम्यान, अपक्ष आमदार देवेंद्र भूयार यांनी एकनाथ शिंदेबाबत बोलताना सांगितले की, काल विधान भवनात मी एकनाथ शिंदेंना भेटलो होतो. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता होती. पण एकनाथ शिंदे भाजपमध्ये जातील असे वाटत नाही. ते खमके नेते आहेत. एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंचे शिष्य होते. ते खमक्या माणूस आहेत. पण आमदारांची कामे होत नसल्याबद्दल ते सरकारवर नाराज होते, अशी पुस्तीही भूयार यांनी जोडली.

हे सुद्धा वाचा : 

एकनाथ शिंदे निष्ठावंत शिवसैनिक, ते शिवसेना सोडणार नाहीत : संजय राऊत

EXCLUSIVE : शिवसेनेचे ३५ आमदार भाजपच्या संपर्कात

भांडण महाविकास आघाडी आणि भाजपचे; पण नासाडी टरबुजांची

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी