34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीयविकास कामांची ऐसीतैसी, मुख्यमंत्री शिंदे अजित पवारांचा घेणार बदला?

विकास कामांची ऐसीतैसी, मुख्यमंत्री शिंदे अजित पवारांचा घेणार बदला?

टीम लय भारी

मुंबई : राज्यात शिंदे – फडणवीस सरकार आल्यापासून रोज नवीन काहीतरी घडामोड जनतेचे लक्ष वेधून घेते. सत्तांतराच्या नाट्यानंतर सुद्धा शिंदे गट गप्प बसलेले नाही, महाविकास आघाडी सरकारच्या बांधणीचा प्रचंड राग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वागणूकीतून आता दिसून येऊ लागला आहे. दरम्यान, याचाच प्रत्यय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीदरम्यान पाहायला मिळाला. मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बारामती मतदार संघातील मार्च ते जून 2022 मधील मंजूर कामांना स्थगिती देत दणका दिला आहे.

हाती आलेल्य वृत्तानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल 941 कोटींच्या नगरविकास विभागाच्या कामांना स्थगिती दिली असून त्यातील एकट्या बारामती नगरपरिषदेच्या 245 कोटी कामांना स्थगिती दिली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे मार्च ते जून 2022 मधील दरम्यानच्या मंजूर कामांना ही स्थिगिती दिल्याने राजकीय वर्तुळातुन आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

शिवसेना आमदारांनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्या बंडाची कारणे त्यांना जनतेसमोर मांडली, त्यामध्ये महाविकास आघाडी सरकारमधील अर्थमंत्री अजित पवार यांनी निधी वाटपाबाबत नेहमीच भेदभाव केला, निधी दिला गेला नाही असे सांगण्यात आले होते.

दरम्यान, सत्तेत येताच बारामतीतील कामांना मिळणारी स्थगिती म्हणजे रागाचा वचपा किंवा बदला तर नाही असा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार काय प्रतिक्रिया देणार हे पाहणे सुद्धा आता महत्त्वाचे ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा…

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी यांचे फोटो फेकले कचऱ्यात

‘मार्गारेट आल्वा‘ एनसीपीच्या उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवार; शरद पवार यांनी केली घोषणा

शिवसेनेला पुन्हा फटका; हजारो कार्यकर्त्यांनी धरली शिंदेगटाची वाट

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी