29 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeराजकीयसुधीर मुनगंटीवारींची अनिल देशमुखांना सभागृहात धमकी

सुधीर मुनगंटीवारींची अनिल देशमुखांना सभागृहात धमकी

टीम लय भारी

मुंबई :- पावसाळी अधिवेशन सुरू होताच, सभागृहात गोंधळ सुरू झाला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होते. सुधीर मुनगंटीवार सभागृहात बोलत असतांना, अनिल देशमुख मध्ये त्यांना टोकत होते, यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले, असेच मध्ये मध्ये बोलत राहिले तर तुम्ही आता आत जात आहेत अशी धमकी अनिल देशमुखांना सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात दिली (Such a threat was given to Anil Deshmukh by Sudhir Mungantiwar in the House).

सुधीर मुनगंटीवार सभागृहात बोलत असताना विरोधकांनी त्यांना मध्येमध्ये टोकण्याचा प्रयत्न केला. त्यावर अनिल देशमुख असेच मध्ये मध्ये बोलत राहिले. तर आता आत जात आहेत, अशी धमकीच सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात दिली. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी जोरदार आक्षेप घेत सभागृहात गोंधळ घातला. तर, विधानसभा अध्यक्षांनी हे वाक्य कामकाजातून काढून टाकण्याच्या सूचना दिल्या (The Speaker of the Legislative Assembly instructed to remove these sentences from the proceedings).

विधानसभेतून भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन

विरोधी पक्षनेते अध्यक्षांच्या दालनात आक्रमक, घोषणाबाजीने दालन घुमल

सभागृह सुरू झाल्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला सुरुवात केली. त्यावेळी 50A अंतर्गत सुधीर मुनगंटीवार यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. मुनगंटीवार बोलत असतांना सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी मुनगंटीवार यांना मध्ये मध्ये टोकण्याचा प्रयत्न केला. त्यावर अनिल देशमुख असेच मध्ये मध्ये बोलले आता आत जात आहेत. त्यामुळे मध्ये बोलू नका. मी हरकतीच्या मुद्द्यावर बोलत आहे. हा माझा अधिकार आहे. तुम्ही मध्ये मध्ये बोलण्याचे कारण नाही. इथे सरकारची चमचेगिरी सुरू आहे, असे मुनंगटीवार म्हणाले.

मुनगंटीवार यांच्या या विधानाला काँग्रेस नेते नाना पटोले यांनी जोरदार आक्षेप घेतला. मुनगंटीवार सभागृहात धमकी देत आहे का?, असा सवाल पटोले यांनी केले. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी हे विधान कामकाजातून वगळण्यास सांगितले. त्याला भास्कर जाधव यांनी विरोध केला. सुधीर मुनगंटीवार यांनी मला धमकी दिली आहे. हे कामकाजातून काढून टाकू नका. कामकाजात हे वाक्य ठेवा. ते काढून टाकू नका.

विरोधकांची सभागृहातही मुस्कटदाबी होते; फडणवीस आक्रमक

Posts for which MPSC exams are completed will be filled up by July 31, says Ajit Pawar

मुनगंटीवार यांनी मला तुरुंगात टाकण्याची धमकी दिली आहे. ते रेकॉर्डवरच ठेवा. यांच्या राज्यात सध्या तेच चालू आहे. ईडी, सीबीआय, एसआयटी लावली जात आहे. त्यामुळे त्यांचे विधान रेकॉर्डवरून काढू नका, असे जाधव म्हणाले. तर एखादा आमदार सत्ताधाऱ्यांची बाजू घेत असेल तर त्याला चमचे आहेत का म्हणणे चुकीचे आहे. आमदाराला सत्ताधाऱ्यांच्या बाजूने बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आमदारांना चमचे म्हणणाऱ्या समज देण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांनी केली.

https://youtu.be/vacASVsHa-o

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी