30 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
HomeराजकीयSharad Pawar : माझी लवकरात लवकर चौकशी करा, शरद पवारांचे राज्य सरकारला...

Sharad Pawar : माझी लवकरात लवकर चौकशी करा, शरद पवारांचे राज्य सरकारला खुले आव्हान

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत सद्या तुरुंगात आहेत. त्यांची ईडीकडून कसून चौकशी सुरू आहे. ही चौकशी सुरू असतांना काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे देखील या बैठकीला हजर होते असे ईडीच्या आरोप पत्रात म्हटले आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत सद्या तुरुंगात आहेत. त्यांची ईडीकडून कसून चौकशी सुरू आहे. ही चौकशी सुरू असतांना काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे देखील या बैठकीला हजर होते असे ईडीच्या आरोप पत्रात म्हटले आहे. या आरोपाचे आज स्वत: शरद पवार‍ आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार पर‍िषद घेऊन खंडन केले. पत्राचाळसंबंधी ही मीटिंग 14 ऑगस्ट 2006 मध्ये झाली होती. या मीटिंगला हौसिंगशी संबंधीत सर्वजण हजर होते. हा 1988 सालातील प्रकल्प आहे. आशा प्रकारच्या अनेक बैठकांना राज्याच्या राजकारणात आल्यापासून शरद पवार हजर होते. राजकारणात आल्यापासून 10 हजार बैठका घेतल्या. या सभेच्या इत‍िवृत्तमध्ये नाव असल्याने ईडेने हे गंभीर आरोप केले आहेत.

मात्र आशा प्रकारच्या अनेक बैठकांना शरद पवारांना अनेक वेळा जावे लागले आहे. अनेक वेळा चर्चा करुन मार्ग काढावा लागतो. त्यामुळे माझी चौकशी जरुर करावी असे शरद पवार यांनी सरकारला निक्षून सांगितले आहे. चौकशी करण्यासाठी आम्ही विरोध केला नाही. परंतु पराचा कावळा करु नका, असे यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. महाराष्ट्राचे मर्म स्थान शरद पवार आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात डाव रचून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वास्तवात असे काही घडलेले नाही. पत्राचाळ प्रकरणी बैठक झाली, यात शरद पवारांचा काहीच संबंध नाही. आरोप केला आहे तर ताबडतोब चौकशी करा. हे आरोप बेछूट आणि बेजबाबदार असतील तर त्यांच्यावर कारवाई करा.आरोप करणाऱ्यांवर कारवाई करा असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हे सुद्धा वाचा

Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्यात कोणाची गर्जना होणार, न्यायालयाचा उद्या निकाल

Mobile Charger : मोबाईल चार्जर देखील करु शकतो तुमचे बँक खाते रिकामे

ED : पत्राचाळ बैठकीला ‘दोन’ माजी मंत्री हजर असल्याचा ईडीचा आरोप

प्रकल्पांना दिशा देण्याचे काम पवारांनी केले. या बैठकीमधील तथ्यांचा विपर्यास केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यावेळेला जी बैठक झाली त्या सेक्रेटरीनी सही केलेली तो मीटींगचा इत‍िवृत्तांत आहे. यावेळी ते कागद पत्र समोर घेऊन जितेंद्र आव्हाड बोलत होते. तुमच्या अरोप पत्रात नक्की काय आहे ते स्पष्ट करा. त्यासाठी त्यांनी पान नंबर 7 व पान नंबर 8 वर काय म्हटले आहे, ते स्पष्ट करा दोन्ही गोष्टी स्वच्छ भूम‍िका सांगतील. तसेच मी चौकशीला समोरे जाईन, जेवढया लवकर करता येईल तितक्या लवकर चौकशी करा असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. चार दिवसात, आठ दिवसात, पंधरा दिवसात चौकशी करा असे यावेळी सांगितले.

वास्तव आण‍ि आरोप करणाऱ्यांच्या बाबतीत काय भूमीका घेणार ते राज्य सरकाने सांगावे असा प्रतिप्रश्न देखील शरद पवार यांनी सरकारला यावेळी विचारला. एन्‍रॉनवरुन देखील आरोप झाला होता. मात्र तो एक टक्का देखील सिद्ध करता आला नसल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. या शिवाय राज्य‍ आणि केंद्रासंबंधीत अनेक विषयांवर त्यांनी यावेळी चर्चा केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी