29 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
HomeराजकीयDasara Melava 2022 : दसरा मेळाव्यातून तेजस ठाकरेंची राजकारणात एंट्री

Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्यातून तेजस ठाकरेंची राजकारणात एंट्री

दसरा मेळाव्याची बॅनरबाजी करण्यास शिवसेनेने सुरुवात केली आहे. शिवसेनेकडून या बॅनरवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्याचसोबत शिवसेनेचा हुकुमी एक्का म्हणून पाहण्यात येणाऱ्या तेजस ठाकरे यांचा देखील फोटो लावण्यात आला आहे.

राज्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे यांची शिवसेना असा वाद आता आणखी वाढलेला आहे. त्यात आता येत्या दसऱ्याला शिवतीर्थावर अर्थात छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे नेमक दसरा मेळावा कोण घेणार ? हा वाद थेट कोर्टात गेला आहे. तर मुंबई महानगरपालिकेने याबाबत निर्णय घेतला नसल्याने दसरा मेळाव्याला धरून आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. परंतु शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे हेच दसरा मेळावा घेणार असल्याचे शिवसैनिकांकडून आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून दसरा मेळाव्याचे पोस्टर शेअर करण्यात आले आहेत. तर दसरा मेळाव्याची बॅनरबाजी करण्यास देखील शिवसेनेने सुरुवात केली आहे. शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात येत असलेल्या या बॅनरवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि त्याचसोबत शिवसेनेचा हुकुमी एक्का म्हणून पाहण्यात येणाऱ्या तेजस ठाकरे यांचा देखील फोटो लावण्यात आला आहे.

Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्यातून तेजस ठाकरेंची राजकारणात एंट्री

गेल्या अनेक दिवसांपासून उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरे हे लवकरच राजकारणात एंट्री करणार, असे बोलले जात होते. तेजस ठाकरे हे ठाकरे घराण्यातील सर्वात जास्त आक्रमक व्यक्ती आहेत, असेही बोलण्यात आले. त्यामुळे तेजस ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा हुकुमी एक्का आहेत असेही बोलले गेले. पण आता दसरा मेळाव्याच्या बॅनरवर तेजस ठाकरे यांचा सुद्धा फोटो लागल्याने तेजस ठाकरे हे दसरा मेळाव्याच्या माध्यमातूनच राजकारणात पाऊल ठेवणार असल्याचे जवजवळ निश्चित झाले आहे.

हे सुद्धा वाचा

Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्यात कोणाची गर्जना होणार, न्यायालयाचा उद्या निकाल

Raju Srivastav Passed Away : हास्यवीर राजू श्रीवास्तव यांनी घेतला अखेरचा श्वास

Prakash Ambedkar : ‘आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेवर आघाडी करायला तयार आहोत’

शिवतीर्थावर दसरा मेळावा कोण घेणार ? यावरून सध्या मोठा वाद पेटला आहे. एकीकडे परंपरागत चालत आलेला दसरा मेळावा हा उद्धव ठाकरे हेच घेणार असल्याचे बोलले जात आहे. तर एकनाथ शिंदे यांचा गट हीच खरी शिवसेना आहे, त्यामुळे दसरा मेळावा हा एकनाथ शिंदे घेणार असे शिंदे गटाकडून सांगण्यात येत आहे. पण मुंबई महानगरपालिकेने याबाबत काहीही निर्णय न घेतल्याने आता हा वाद थेट कोर्टात गेला आहे. त्यामुळे या वादावर आता उद्या (ता. २२ सप्टेंबर) कोर्टात निकाल लागून पडदा पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून ‘चलो शिवतीर्थ’ अशा आशयाचे बॅनर झळकवण्यात येत आहे. या बॅनरच्या माध्यमातून गद्दारांना देखील शिवसेनेकडून टोला लगावण्यात आला आहे. ‘गद्दारांना क्षमा नाही’ असा मजकूर सुद्धा या बॅनरवर लिहिण्यात आला आहे. त्यामुळे आता या वादामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता आहे. पण आता शिवसेनेकडून त्यांचा तेजस ठाकरे हा हुकुमी एक्का बाहेर काढण्यात आल्याने येणाऱ्या काही दिवसांत राजकारणात आणखी कोणतं वादळ येणार हे पाहणे देखील तितकेच महत्वाचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी