29 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रEknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आज आमने -...

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे आज आमने – सामने, करणार मोठी घोषणा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यावेळी पत्रकार परिषद घेणार आहेत त्यावेळी काही महत्त्वाचे नेते सुद्धा त्यांच्यासमवेत उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे दिल्लीतून आज मोठी घोषणा होणार म्हणून राजकीय वर्तुळातून सुद्धा चर्चेला उधाण आले आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या संवादाच्या वेळा आज एकत्र येणार असल्याने एकच गोंधळ उडणार असून दोघेही नेमकं काय बोलणार याकडे आता राज्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे. 

राज्यात आज वेगळ्याच कारणावरून सगळ्यांची उत्सुकता कमालीची ताणली गेली आहे. आज सायंकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभा घेणार असून ते जाहीर संवाद साधणार आहेत, तर त्याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा दिल्लीतून पत्रकार परिषद घेणार असून काहीतरी महत्त्वपूर्ण निर्णयाची घोषणा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे सध्या एकच संभ्रम पाहायला मिळत आहे. एकाचवेळी पत्रकार परिषद आयोजित करून मुख्यमंत्री शिंदे हे ठाकरे जे बोलणार आहेत त्याचे महत्त्व कमी करणार आहेत का असा सवाल सद्धा यानिमित्ताने विचारण्यात येत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यावर असून आजच्या पत्रकार परिषदेत ते महत्त्वपूर्ण काय सांगणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, आज दुपारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीतील वरिष्ठांच्या गाठीभेटी घेणार आहेत, तर त्यांच्या बैठकांना सुद्धा उपस्थित राहणार आहेत. काही मंत्र्यांसह एकनाथ शिंदेंचा आजचा दिल्ली दौरा ठरला असून या दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री शिंदे नितीन गडकरी आणि अश्विनी वैश्णव यांची सुद्धा भेट घेणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या सगळ्या भेटीगाठींनंतर एकनाथ शिंदे दिल्लीतूनच पत्रकार परिषद घेणार आहेत, परंतु या पत्रकार परिषदेच्या वेळेवरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे कारण मुख्यमंत्री शिंदे हे उद्धव ठाकरे यांचे ज्या वेळेस भाषण होणार त्याच वेळी संबोधन करणार आहेत.

हे सुद्धा वाचा…

Aditya Thackeray : ‘ठाकरेंच्या लग्नाचा मुद्दा हे केवळ बालिश चाळे’, सुषमा अंधारेंचा पलटवार

Sharad Pawar : माझी लवकरात लवकर चौकशी करा, शरद पवारांचे राज्य सरकारला खुले आव्हान

Dasara Melava 2022 : दसरा मेळाव्यातून तेजस ठाकरेंची राजकारणात एंट्री

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच्या पत्रकार परिषदेत काहीतरी महत्त्वाचे सांगणार असल्याच्या वावड्या उठत असल्याने राज्यासहित अवघ्या देशाचे सुद्धा ते लक्ष वेधून घेणार का असा सवाल आता विचारण्यात येत आहे. तर दुसरीकडे आज संध्याकाळी मुंबईतील नेक्सो मैदानावर उद्धव ठाकरे यांची एक महत्त्वपूर्ण सभा पार पडणार आहे. या सभेमध्ये ते शिवसेनेच्या गटप्रमुखांना ते संबोधित करणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहेत, त्यामुळे आजच्या या सभेत उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार याची सुद्धा अनेकांना उत्सुकता लागली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यावेळी पत्रकार परिषद घेणार आहेत त्यावेळी काही महत्त्वाचे नेते सुद्धा त्यांच्यासमवेत उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे दिल्लीतून आज मोठी घोषणा होणार म्हणून राजकीय वर्तुळातून सुद्धा चर्चेला उधाण आले आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या संवादाच्या वेळा आज एकत्र येणार असल्याने एकच गोंधळ उडणार असून दोघेही नेमकं काय बोलणार याकडे आता राज्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी