30 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
HomeमुंबईCoronavirus : मंत्रालयात कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन, मंत्र्यांचे दालन रिकामे करून कक्ष...

Coronavirus : मंत्रालयात कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन, मंत्र्यांचे दालन रिकामे करून कक्ष कार्यान्वित

Coronavirus चे राज्यात ६४ रूग्ण

टीम लय भारी

मुंबई : कोरोना विषाणू ( Coronavirus ) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उद्योग – व्यवसाय क्षेत्रातील समस्या समजून घेण्यासह मदत कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था, व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासाठी मंत्रालयात करोना नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे दालन रिकामे करून त्या ठिकाणी हा कक्ष स्थापन केला असल्याचे सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाने युद्धपातळीवर विविध उपाययोजना हाती घेतल्या असून राज्य सरकार, प्रशासन आणि वैद्यकीय यंत्रणा अहोरात्र कार्यरत आहेत. राज्यात कोरोना विषाणूमुळे ( COVID-19 ) उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्यविषयक आपत्कालिन परिस्थिती हाताळण्यासाठी मंत्रालयात राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार हा नियंत्रण कक्ष कार्यन्वित करण्यात आला आहे.

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी विविध संस्था, व्यक्ती यांना शासकीय यंत्रणांना सहकार्य, सहयोग करण्याची इच्छा असते त्यांनी [email protected]  या ईमेलवर संपर्क साधावा. शासनाने केलेल्या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर उद्योग-व्यवसायांच्या अनुषंगाने काही प्रश्न असतील तर त्यांनी [email protected] या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन करोना नियंत्रण कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

कायदा व सुव्यवस्थेशी संबंधित शंकांचे निरसन कुणाला करावयाचे आहे त्यांनी [email protected] या ईमेलवर तर शासनाने दिलेल्या निर्देशांबद्दल, आखलेल्या धोरणांच्या अंमलबजावणीबद्दल स्पष्टीकरण हवे असल्यास [email protected] या ईमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन या कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

राज्यात आणखी १२ जण करोना बाधित, राज्यातील एकूण रुग्ण संख्या ६४

कोरोनाचे राज्यात आज एकूण १२ नवीन रुग्ण आढळले असून यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ६४ झाली आहे. त्यामध्ये ८ रुग्ण मुंबई येथील तर २ जण पुणे येथील आहेत. प्रत्येकी १ रुग्ण यवतमाळ आणि कल्याण येथील आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मुंबईत आढळलेल्या ८ रुग्णांपैकी ६ जणांचा परदेश प्रवासाचा इतिहास आहे, तर एक जण विमानतळावर काम करणारा कर्मचारी असून आणखी एक रुग्ण गुजरातमध्ये प्रवास केलेला आहे. यवतमाळ येथील असणारा पण मुंबईत भरती असलेल्या रुग्णाने कांगो देशाचा प्रवास केलेला आहे. कल्याण येथील करोना बाधित रुग्ण हा दोन दिवसांपूर्वी बाधित आढळलेल्या आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेल्या उल्हासनगर येथील तरुणीचा भाऊ आहे. तो स्वतःही बहीणीसोबत दुबईला गेला होता. पुणे येथील २५ वर्षाच्या बाधित तरुणाने इंग्लंड आणि आयर्लंड येथे प्रवास केलेला आहे. दरम्यान, कुठलाही परदेश प्रवासाचा इतिहास नसलेली एक ४१ वर्षाची पुण्यातील महिला करोना बाधित आढळलेली आहे. हा रुग्ण बाधित येण्यामागील कारणमीमांसा तिच्या साथरोगशास्त्रीय अन्वेषणानंतर स्पष्ट होईल.

राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील असा

  • पिंपरी चिंचवड मनपा         १२
  • पुणे मनपा         ११ (दि. २१मार्च रोजी २ रुग्ण आढळले)
  • मुंबई १९ (दि. २१मार्च रोजी ८ रुग्ण आढळले)
  • नागपूर ०४
  • यवतमाळ, कल्याण प्रत्येकी ०४       (दि.२१मार्च रोजी प्रत्येकी १ रुग्ण आढळले)
  • नवी मुंबई  ०३
  • अहमदनगर                  ०२
  • पनवेल, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी प्रत्येकी १

      एकूण       ६४ (मुंबईमध्ये एक मृत्यू)

राज्यात आज एकूण २७५ परदेशातून आलेले प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकुण १८६१ प्रवासी आले आहेत. १८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत १५९२ जणांना भरती करण्यात आले होते. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी १२०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ६४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.

करोना आजार होण्याच्या भितीने अनेकांनी आपल्याकडील पाळीव प्राणी सोडून देण्यास सुरुवात केली आहे,अशा तक्रारी हेल्पलाईनवर प्राप्त होत आहेत. पाळीव प्राण्यांपासून करोना संसर्ग झाल्याची कोणतीही उदाहरणे नाहीत, त्यामुळे लोकांनी घाबरुन आपले पाळीव प्राणी सोडून देऊ नयेत, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

राजेश टोपे यांची सीएसएमटी स्थानकाला भेट

दरम्यान, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आज सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाला भेट दिली. ‘कोरोना’साठी ‘होम कॉरन्टाईन’ केल्याबाबत हातावर स्टॅम्प असलेले काहीजण स्थानकात आहेत, असा फोन आला होता. म्हणून मी तातडीने स्थानकामध्ये आलो. परदेशातून विमानतळावर अनेकजण येत आहेत. त्यांना विमानतळ प्राधिकरणाकडून असे सोडून नये असे मी प्राधिकरणाला सांगणार आहे. उद्यापासून विमान वाहतूक सुद्धा बंद करण्यात येणार असल्याचे टोपे यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.

Rajesh Tope visits to CSMT stn
राजेश टोपे यांनी सीएसएमटी स्थानकाला आज भेट दिली

मुंबईसह प्रमुख शहरांमधील काम बंद करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. त्यामुळे काम नसलेले अनेकजण आपापल्या गावी जायला निघाले आहेत. अशा गावी जाऊ इच्छिणाऱ्या अनेकांमुळे स्थानकांवर गर्दी वाढली आहे. त्यामुळे गावी जाऊ इच्छिणाऱ्या अशा लोकांसाठी रेल्वेने अधिक गाड्या सोडाव्यात असे मत टोपे यांनी यावेळी व्यक्त केले.

होम क्वारंटाईनच्या सूचना असलेल्यांनी स्थलांतर केल्यास कायदेशीर कारवाई

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून ज्यांना ‘होम क्वारंटाईन’च्या सूचना दिल्या आहेत त्यांनी घरातच रहावे स्थलांतर केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्य शासनाने आज महसूल आणि पोलिस यंत्रणेला आज दिले.
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासन प्रभावी उपाययोजना करीत आहेत. ज्यांनी बाधित भागातून प्रवास केला आहे अथवा परदेश प्रवासाचा इतिहास आहे किंवा बाधित भागातून प्रवास केलेल्यांच्या निकटचे व्यक्ती आहेत अशांना होम क्वारंटाईनच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश, नागपूर महानगर प्रदेश येथील ज्या व्यक्तींना होम क्वारंटाईनचे आदेश आहेत त्यांना तेथेच राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. महसूल आणि पोलिस यंत्रणेतील अधिकारी घरोघरी जाऊन अशा व्यक्तींची तपासणी करतील. संबंधित व्यक्ती घरात आढळली नाही तर त्यांच्यावर कायदेशीर करवाई करण्याचे निर्देश या यंत्रणेला देण्यात आल्याचे राज्य शासनाकडून आज सांगण्यात आले.

हे सुद्धा वाचा

Coronavirus : दहावीच्या उरलेल्या एका विषयाचीही परीक्षा लांबणीवर

मुंबईत लग्न समारंभाला आलेल्या पुण्यातील ४२ वर्षी महिलेला कोरोनाची लागण

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी