30 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रMahatma Phule : अजितदादांचे आवाहन, ‘कोरोना’च्या संकटात घरातच महात्मा फुलेंच्या विचारांचे स्मरण...

Mahatma Phule : अजितदादांचे आवाहन, ‘कोरोना’च्या संकटात घरातच महात्मा फुलेंच्या विचारांचे स्मरण करा

टीम लय भारी

मुंबई : बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवून वैचारिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचं श्रेय क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले ( Mahatma Phule ) यांना आहे. त्यांचे सत्यशोधक विचारच महाराष्ट्राला पुढे घेऊन जातील, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

क्रांतीसूर्य महात्मा फुले ( Mahatma Phule ) जयंती निमित्तानं उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना अभिवादन केलं असून राज्यातील जनतेला सत्यशोधक विचार पुढे घेऊन जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राज्यावरील कोरोनाचं संकट लक्षात घेऊन सर्वांनी आपापल्या घरात थांबूनच क्रांतीसूर्य महात्मा फुले ( Mahatma Phule ) यांच्या विचारांचं, कार्याचं स्मरण करावं.

जयंतीचे जाहीर कार्यक्रम आयोजित करु नयेत व कुणीही घराबाहेर पडू नये, घरातंच रहा, सुरक्षित रहा, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

क्रांतीसूर्य महात्मा फुले ( Mahatma Phule ) यांच्या कार्याचं, विचारांचं स्मरण करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, महात्मा ज्योतीबा फुले ( Mahatma Phule ) यांनी बहुजन समाजाला शिक्षणाचं महत्व पटवून दिलं तसंच शिक्षणाची संधीही उपलब्ध केली. महिलांसाठी शिक्षणाची दारं खुली करुन दिली.

अनेक क्षेत्रात, महिला आत्मविश्वासानं जबाबदारी सांभाळताना दिसतात त्याचं श्रेय क्रांतीसूर्य महात्मा फुले ( Mahatma Phule ) आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाला आहे. या दोघांनी समाजकार्याचा डोंगर उभा केला. अंधश्रद्धा, अस्पृश्यता, वाईट चाली-रिती, अनिष्ट रुढी-परंपरांवर कडाडून हल्ला चढवला. त्यासाठी त्रास, अपमान सहन केला.

क्रांतीसूर्य महात्मा फुले ( Mahatma Phule ) यांनी शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, महिलांना, समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांना हक्काची जाणीव करुन दिली व ते मिळवण्यासाठी बळ दिलं. क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोघांचं सामाजिक कार्य अलौकिक आहे. त्यांचं कार्य, विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्याचा निर्धार आपण जयंतीच्या निमित्तानं करुया, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या दोघांच्या कार्याचं स्मरण करुन अभिवादन केलं आहे.

कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्यात काही ठिकाणी कृषी बाजार, भाजी मंडया थोड्या काळासाठी बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने लोकहितासाठी घेतला आहे. सरकारच्या या अल्पकालिन निर्णयाला संबंधित शेतकरी व नागरिकांनी सहकार्य करावं, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

आणखी बातम्या वाचण्यासाठी आमचे ट्विटर अकाऊंट फॉलो करा

हे सुद्धा वाचा

NCPvsBJP : ‘गृह सचिव गुप्ता यांनी ते पत्र स्वतःहूनच दिले, शरद पवार – देशमुखांची मान्यता नाही’

Wadhawan : शरद पवार, अनिल देशमुखांवर भाजपचा निशाणा

कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी ‘अहिल्या आरोग्य हेल्पलाइन’ची मोफत सेवा!

व्हिडीओ पाकिस्तानातील, बदनामी तबलिगींची

Mahatma Phule : अजितदादांचे आवाहन, ‘कोरोना’च्या संकटात घरातच महात्मा फुलेंच्या विचारांचे स्मरण करा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी