26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
HomeमुंबईTejasvi Satpute : सोलापूर ग्रामीणच्या SP तेजस्वी सातपुतेंच्या 'त्या ' निर्णयाचे गृहमंत्री...

Tejasvi Satpute : सोलापूर ग्रामीणच्या SP तेजस्वी सातपुतेंच्या ‘त्या ‘ निर्णयाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून कौतुक

टीम लय भारी

मुंबई : पोलीस दलातील तेजस्वी अधिकारी म्हणून ओळख असलेल्या सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते (Tejasvi Satpute) यांनी पोलीसांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सुट्टी देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे त्यांचे पोलीस दलात कौतुक होत आहे. विशेष म्हणजे सातपुते यांच्या निर्णयाचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वागत करत कौतुक केले आहे.

गृहमंत्री देशमुख यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सातपुते यांचा निर्णय कौतुकास्पद असल्याचे म्हटले आहे, तेजस्वी सातपुते आपण पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना वाढदिवसानिमित्त सुट्टी देण्याचा घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे. या निर्णयामुळे पोलीस आपला खास दिवस कुटुंबीयांसोबत साजरा करू शकतील. यामुळे पोलीस तणावमुक्त होऊन नव्या जोमाने व प्रचंड उत्साहाने काम करतील, याची मला खात्री आहे, असे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे. देशमुख यांच्या ट्विटला रिप्लाय करत, तेजस्वी सातपुते यांनी गृहमंत्र्यांचे आभार मानले आहेत. तसेच, आपल्या तसेच, आपले कौतुकाचे शब्द आम्हाला प्रेरणा देतात, असेही सातपुते यांनी म्हटले आहे.

पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी पोलीसांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक पोलिस अधिकारी व कर्मचारी यांना किमान त्यांचा वाढदिवस त्यांचे कुटुंबीयासमवेत साजरा करता यावा, यासाठी त्यांना एकदिवस निश्चित सुट्टी देण्याचा निर्णय पोलीस अधीक्षकांनी घेतला. तसेच त्यांना वाढदिवसाचे शुभेच्छापत्रही देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे कामकाज तणावरहीत होईल आणि पोलिसांना त्यांच्या कुटुंबीयांसोबत एक आनंदाने दिवस साजरा करता येईल, असे सातपुते यांचे मत आहे. या निर्णयामुळे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे कौतुक होत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी