30 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeटॉप न्यूजबर्ड फ्ल्यूचे संकट दाराशी

बर्ड फ्ल्यूचे संकट दाराशी

टीम लय भारी : अतुल माने, वरिष्ठ पत्रकार

मुंबई : 2020 मध्ये सुरू झालेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव 2021 या नूतन वर्षात कायम असतानाच आता बर्ड फ्ल्यू (Bird flu) हा नवीन आजार दाराशी येऊन ठेपल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश तसेच पंजाब, केरळ, राजस्थान, झारखंड, उत्तराखंड मध्ये सध्या बर्ड फ्ल्यूचे संकट सुरू झाले असून देशातील अन्य राज्याबरोबर ते महाराष्ट्र मध्ये सुद्धा येण्याचा धोका निर्माण झाला आहे.

हिमाचल मधील कांडगा जिल्ह्यातील पोंग तलावात मृतावस्थेत असलेल्या काही स्थलांतरित पक्ष्यामध्ये बर्ड फ्ल्यू चे विषाणू आढळून आले. असाच प्रकार राजस्थान मध्येही झाल्याचे वृत्त आहे. तेथील अनेक जिल्ह्यात पक्षी मृत होत असून त्यांच्यात बर्ड फ्ल्यू चे विषाणू आढळून आले आहेत. आतापर्यंत सुमारे 250 हुन जादा पक्षी येथे मृतावस्थेत आढळले आहेत.,

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार झालावड येथील काही पक्ष्यांचे नमुने परीक्षणासाठी भोपाळ येथील राष्ट्रीय पशुरोग संशोधन संस्थेकडे पाठविण्यात आले होते. ज्यामध्ये बर्ड फ्ल्यू या विषाणूचे अस्तित्व असल्याचे निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे.

दरम्यान केरळ मधील अलपुझा आणि कोत्तायम येथेही या विषाणूचा प्रसार झाला असल्याने आता तेथील सर्व प्रभावित क्षेत्रातील कोंबड्या , बदक आणि अन्य पाळीव पक्षांना मारण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाने दिले आहेत. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी किमान 50 हजार पक्ष्यांना मारावे लागणार असल्याची माहिती देण्यात आली. तर हिमाचल प्रदेश मध्ये इदेरा, देहरा, फतेहपुर, जवाली, या आणि अन्य भागात कोंबडी, बदक या प्रजातीपासून मिळणारी उत्पादन तसेच अंडी, मांस याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. झारखंड, बिहार आणि उत्तराखंड मध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून तेथेही अंडी आणि चिकन विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

हा विषाणू पक्षी तसेच मनुष्य प्रजातीवर सुद्धा वेगाने संसर्ग पसरवितो. सध्या तरी महाराष्ट्र मध्ये अशा संसर्गाचा प्रादुर्भाव झालेले प्राणी, पक्षी आढळून आले नसले तरी खबरदारी घ्यावीच लागणार असल्याचे आरोप मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. आरोग्य यंत्रणा सर्व स्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही टोपे म्हणाले. तर कोंबडी आणि बदक यांच्या माध्यमातून हा विषाणू पसरत असल्यामुळे पोल्ट्री फार्म मालक पुन्हा एकदा चिंतेत पडले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी