34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराष्ट्रीयपुरेसे इंधन नसताना गाडी चालवली म्हणून वाहतूक पोलिसांनी पाठवले चलन

पुरेसे इंधन नसताना गाडी चालवली म्हणून वाहतूक पोलिसांनी पाठवले चलन

टीम लय भारी

केरळ : बऱ्याचदा वाहतुकीचे नियम पाळले नाही म्हणून वाहनधारकांना वाहतूक पोलिसांकडून चलन पाठवण्यात येते, तरीही या नियमांना धाब्यावर बसवत अनेकजण नियम तोडण्यात धन्यता मानतात. परंतु यावेळी मात्र वाहतूक पोलिसांनी ज्या कारणासाठी एका व्यक्तीला चलन पाठवले सध्या त्या कारणाचीच चर्चा सोशलमीडियावर पाहायला मिळत आहे. सदर घटना केरळमध्ये घडली असून मोटारबाईकवरून पॅसेंजरसोबत प्रवास करत असताना पुरेसे इंधन नसताना सुद्धा गाडी चालवली म्हणून केरळ पोलिसांनी हे चलन पाठवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केरळ येथील बसील श्याम नावाची व्यक्ती त्यांच्या राॅयल इन्फिल्ड मोटारसायकलवरून ऑफिसला निघाले असताना स्थानिक वाहतूक पोलिसांनी त्यांना थांबवले आणि वनवे रोडवरून विरूद्ध दिशेने येण्यावरून विचारणा केली. दरम्यान श्याम यांना या गुन्ह्यासाठी 250 रुपयांचा दंड भरण्यास सांगितले, ज्याचे त्यांंनी रीतसर पालन केले. बसील श्याम त्यांच्या कार्यालयात पोहोचले आणि सहजच चलान पाहिले तर त्यांना धक्काच बसला. ‘प्रवाशांसह पुरेशा इंधनाशिवाय गाडी चालवणे’ हे कारण त्या चलनमध्ये लिहून त्यांना दंड आकारण्यात आला होता.

दरम्यान श्याम यांनी याबाबत फेसबूक पोस्ट करत त्या चलानचा फोटो सुद्धा पोस्ट केला, त्यामुळे सोशल मिडायावर ही पोस्ट तुफान व्हायरल झाली. ही बाब गांभिर्याने घेत वाहतूक विभागाकडून चलान जारी करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा…

आदेशापूर्वीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार, सुप्रीम कोर्टचा धक्का

…म्हणून उद्धव ठाकरे आणि बारक्या टेबल टेनिस खेळण्यापुरतेच शिल्लक राहिलेत, राणेंचा ठाकरेंवर वार

मंत्रिमंडळाच्या बैठकीत खडाजंगी; मुख्यमंत्र्यांवर अन्य मंत्री वैतागले !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी