30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीय‘एक शिवसैनिक 100 कोटीचा‘

‘एक शिवसैनिक 100 कोटीचा‘

टीम लय भारी

अलिबाग : ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. ईडीपासून सुटका करून घेण्यासाठी तुम्ही त्यांच्या सोबत गेला. पंचतारांकित हाॅटेलमध्ये तुम्ही कैदी आहात. भरत गोगावले काय होता, कोण झाला. पैशासाठी आले आणि पैशासाठी गेले. अलिबागला पण झाडी, डोंगर आहेत. महाराष्ट्रात काय स्मशान आहे का? या सभेनंतर करेक्ट कार्यक्रम करू, असे फडवीस म्हणाले होते. ठाकरे परिवाराला कोणीही शिवसेनेपासून कोणीही वेगळे करू शकत नाही, असे वक्तव्य संजय राऊत यांनी अलिबाग येथे घेतलेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात केले. यावेळी त्यांनी बंडखोर नेत्यांचा खरपूस समाचार घेतला.

बंडू शिंग्रेने प्रती शिवसेना काढली होती. तो वेडा होऊन रस्त्यावर आला. शिवसेना सोडून गेले ते गुलाम झाले. तुम्हाला शिवसेनेत राहायचे नाही. तर तुमची शिवसेना कशी? जिथे ठाकरे तिथे शिवसेना. तुम्हाला सुखाने झोप येणार नाही? एक-एक आमदारांची किंमत 50 कोटी आहे. पण आमचा एक शिवसैनिक 100 कोटीचा आहे. अनेक शिवसैनिक निष्ठेने आहेत. आम्ही देखील कोणी नव्हतो. बाळासाहेब ठाकरेंचा आत्मा वरुन बघतोय. आता तुमची राजकीय कबर खोदली गेली आहे. हेच सत्य आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

रायगड जिल्हा जिथे गवताला देखील भाले फुटतात. तो रायगड जिल्हा. काही झाले तरी आता ‘झुकेंगे नही‘. संजय राऊत बोलतो म्हणून त्याला तुरुंगात टाकायचे. मला फासावर द्या. रायगडमध्ये बेईमान लोक तयार होतील असे वाटले नव्हते. हा मेळावा म्हणजे रणशिंग आहे. उद्धव ठाकरे यांना सन्मानाने वर्षा बंगल्यावर न्यायचे आहे. या राज्यावर, मुंबईवर, रायगड जिल्ह्यावर भगवा झेंडा फडकता राहावा. हीच आमची इच्छा आहे, असे बोलून संजय राऊत यांनी उपस्थित शिवसैनिकांचा मनोबल उंचाविण्याचा प्रयत्न केला.

हे सुध्दा वाचा:

VIDEO : ‘काय झाडी, काय डोंगार… शहाजी पाटलांनी एकनाथ शिंदेंना ऐकवला आपला फेमस डॉयलॉग

राज्यात होणार ७ हजार जागांसाठी पोलीस भरती

उध्दव ठाकरे फडणवीसांशी बोलले ही सकारात्मक बाब; आता शिंदेना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करावे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी