29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeशिक्षणबारावीच्या बोर्डाचा पेपर फुटलाच नाही, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

बारावीच्या बोर्डाचा पेपर फुटलाच नाही, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

टीम लय भारी

मुंबई : बारावी बोर्डाच्या परीक्षेचा प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक केली आहे. मुकेश सिंह यादव असं या शिक्षकाचं नाव आहे. प्रश्नपत्रिकेचे वाटप झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेचा काही भाग व्हॉट्सअपच्या माध्यमातून एका विद्यार्थीनीच्या मोबाईलवर आढळून आला. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी सभागृहात दिली.

बारावी बोर्डाचा रसायनशास्त्र पेपर फुटला असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये खळबळ उडाली होती. या विषयावर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत निवेदन सादर करत सभागृहाला या प्रकरणाबाबत माहिती दिली. वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, नियमानुसार सकाळी १०.२० वाजता प्रश्नपत्रिकेचं वाटप झालं होतं. विलेपार्ले येथील परीक्षा केंद्रावर एका विद्यार्थिनीला उशीर झाला होता. तेव्हा तिचा फोन तपासला असता प्रश्नपत्रिकेचा काही भाग मोबाईलमध्ये १०.२४ वाजता आढळून आला असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे हा संपूर्ण पेपर फुटला असे म्हणता येणार नाही असेही वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी मालाड येथील खासगी कोचिंग क्लासेसच्या शिक्षकाला अटक केली आहे. त्यानंतर हा मोबाइल ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. मोबाईलवर प्रश्नपत्रिकेचा भाग आढळणे ही गंभीर बाब असून भविष्यात असे प्रकार होऊ नये यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी