38 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
Homeमनोरंजनशिक्षण क्षेत्रात घोटाळा केल्या प्रकरणी अभिनेता पुष्कर जोगच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल

शिक्षण क्षेत्रात घोटाळा केल्या प्रकरणी अभिनेता पुष्कर जोगच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल

टीम लय भारी

१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२२ या तीन वर्षांच्या कालावधी दरम्यान जोग (Actor Pushkar Jog एज्युकेशन ट्रस्टतर्फे चालवल्या जाणाऱ्या ११ शाळांचे बनावट प्रमाणपत्र तयार केले. त्यानंतर शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) २५ टक्के मोफत प्रवेशातील विद्यार्थ्यांच्या शुल्काचा परतावा शिक्षण विभागाकडून लाटण्याचा प्रकार समोर आला आहे.(Actor Pushkar Jog mother against Case filed)

या प्रकरणी जोग एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षांसह तत्कालीन उपशिक्षणाधिकारी आणि चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जोग एज्युकेशन ट्रस्टच्या (Actor Pushkar Jog) अध्यक्षा सुरेखा सुहास जोग, तत्कालीन उपशिक्षणाधिकारी किशोर पवार, वरिष्ठ सहायक गौतम शंकर शेवडे, हेमंत सावळकर या चौघांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेखा सुहास जोग म्हणजे अभिनेता पुष्कर जोग याची आई. जोग एज्युकेशन ट्रस्टच्या अध्यक्षांपदी गेले अनेक वर्षापासून कार्यरत आहेत. परंतू आता शिक्षण विभागाची फसवणूक केल्या प्रकरणी पुण्यातील (Actor Pushkar Jog) बंडगार्डन पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा :- 

‘Adrushya’: Reasons to watch Pushkar Jog and Manjari Fadnis starrer

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपने मंत्रालयावर काढलेला मोर्चा म्हणजे निव्वळ ढोंग : नाना पटोले

महसूल विभागात धक्कादायक प्रकार, वरिष्ठ अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी