38 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
Homeराजकीयआदित्य ठाकरे यांनी सभागृहात राहूल नार्वेकरांचे सांगितले नाते

आदित्य ठाकरे यांनी सभागृहात राहूल नार्वेकरांचे सांगितले नाते

टीम लय भारी

मुंबई: माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज सभागृहात राहूल नार्वेकर त्यांच्या नात्या संबंधीही सांगितले. राहूल नार्वेकर आणि माझे मैत्रिचे संबंध आहेत. आम्ही मित्र म्हणून एकत्र बसायचो. आम्ही दिल्लीला सोबत जायचो. अनेक वेळा काॅलेजला असतांना, माझा कायदयाचा अभ्यास सुरु असतांना मी चर्चा करण्यासाठी त्यांच्या घरी जायचो. अनेक वेळा रात्री जागून आम्ही कायदयाची चर्चा करायचो.अशा प्रकारे राहूल नार्वेकरांच्या आठवणींना आदित्य ठाकरेंनी सभागृहात उजाळा दिला.

‘आम्ही कानात सांगितले ते ऐकले नाही‘ आमचे ऐकले असते तर ही वेळ आली नसती. असा खोचक टोला आज विधानसभेत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना लागावला. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावाच्या वेळी ते बोलत होते. भाजपचे राहूल नार्वेकर 164 मतांनी निवडून आले. सर्वात तरुण विधासभा अध्यक्ष म्हणून त्यांनी इतिहास रचला. अनेकांनी त्यांचे तोंडभरुन कौतुक केले.

सुधीर मुनगंटीवार यांनी आदित्य ठाकरेंची फिरकी घेत त्यांना गुरुदक्षिणा देण्याचा सल्ला दिला होता. गुरु दक्षिणा म्हणून उरलेले आमदार दयावे असे विधान करुन सभागृहात खिल्ली उडवली होती. त्याला उत्तर देतांना त्यांनी राहूल नार्वेकर आणि त्यांच्या मैत्री बददल सांगितले.
त्याचप्रमाणे विधासभा अध्यक्षांची निवड करतांना फडणवीसांनी तो विचार पूर्वक निवडला. कारण त्यांचे महाविकास आघाडी मधील दोन पक्षांशी चांगले संबंध आहेत. एक शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस आहे

राहूल नार्वेकर यांनी अनेक पक्ष बदलले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी आणि आता ते भाजपमध्ये आहेत. लोकसभेत 2014 मध्ये त्यांनी लोकसभेच्या सभागृहात जावी ही आमची इच्छा होती’ असेही आदित्य ठाकरेंनी यावेळी सांगितले. आता ‘जे घडतयं ते तरुणांना आवडतयं का‘ ? असा सवाल आदित्य ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना विचारला.

हे सुध्दा वाचा:

एकनाथ शिंदेंनी माझ्या कानात सांगितले असते तरी त्यांना मुख्यमंत्री बनविले असते : अजित पवार

जयंत पाटील यांनी राज्यपालांना ‘गोंजारत‘ चिमटे काढले!

शिवाजीराव आढळराव – पाटील हे शिवसेनेतच, त्यांची हकालपट्टी नाही!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी