33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रआदित्य ठाकरेंनी घेतली प्रसाद सावंत यांची रुग्णालयात भेट

आदित्य ठाकरेंनी घेतली प्रसाद सावंत यांची रुग्णालयात भेट

टीम लय भारी

पनवेल : राज्यात सुरु असलेले सत्ता नाटय शिगेला पोहोचले आहे. काल उध्दव ठाकरे आणि बंडखोर एकनाथ शिंदेंचे समर्थक रस्त्यावर उतरले होते. दोन्ही गटातील समर्थक आपल्या नेत्याचा जयजयकार करत होते. या आंदोलनाला वेगळे वळण लागले. दोन्ही गटातले कार्यकर्ते हातघाईवर आले, त्यांनी शिवसेनेचे नगरसेवक प्रसाद सावंत यांच्यावर प्राण घातक हल्ला केला. ते रायगड जिल्हयातील माथेरानचे आमदार आहेत. सध्या त्यांच्यावर एमजीएम रुग्णालय कळंबोली येथे उपचार सुरु आहेत.

आज युवासेना प्रमुख आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांची रुग्णालयात जावून भेट घेतली. यावेळी अदित्य ठाकरेंनी प्रसाद सावंत यांना धीर दिला. त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. ‘प्रसाद घाबरु नकोस‘ शिवसेना तुमच्या पाठीशी आहे. सध्या राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. मतदार संघात जावून ते शिवसैनिकांची भेट घेत आहेत. त्यांनी बंडखोर नेत्यांना चांगलेच फैलावर घेतले.

सध्याकोर्टाच्या निर्णयामुळे बंडखोर आमदारांना दिलासा मिळाला असून, आसाममधून महाराष्ट्रात कसे यायचे याची रणनिती आखली जात आहे. महाविकास सरकार अडचणीत आले आहे. तर शिंदे गट कोणत्याही गटात विलीन होणार नाही. शिवसेनेवर दावा करणार असल्याची महिती सूत्रांकडून मिळाली आहे. आज एकनाथ शिंदे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर पुढची रणनिती आखली जाण्याची शक्यता आहे.

हे सुध्दा वाचा:

सरकार अस्थिर, बदल्यांसाठी ‘किंमत’ मोजलेले अधिकारी हवालदिल

लवकरच ‘शिंदे‘ मुंबईत येण्याची शक्यता

भाजपचा शिवसेना फोडण्याचा पहिला डाव यशस्वी : माजी आमदार अनिल गोटे

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी