30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमुंबईआदित्य ठाकरेंचा भन्नाट उपक्रम, जपानच्या सहकार्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविणार 'ही' योजना

आदित्य ठाकरेंचा भन्नाट उपक्रम, जपानच्या सहकार्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविणार ‘ही’ योजना

टीम लय भारी

मुंबई : पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या खात्याच्या माध्यमातून धडाकेबाज कामाला सुरूवात केली आहे. सोमवारीही त्यांनी एक भन्नाट निर्णय घेतला. ठाकरे यांच्या या निर्णयामुळे राज्यातील अनेक शेतकरी, महिला बचत गटांना फायदा होणार आहे. शेतकरी व महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने थेट जपानमध्ये विक्रीसाठी पाठविली जाणार आहेत.

जपानच्या वाकायमा या राज्यातील आमदारांचे एक शिष्टमंडळ महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहे. वाकायमा विधीमंडळाच्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखालील या शिष्टमंडळाने आज पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. वाकायमा राज्यासोबत महाराष्ट्राचा भाऊबंधकीचा (सिस्टर स्टेट) करार आहे. या कराराअंतर्गत यापूर्वी वाकायामामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा एक पुतळा उभारला आहे. त्या व्यतिरिक्त राज्याने या कराराअंतर्गत कोणतेही उल्लेखणीय कार्य केलेले नाही. पण आदित्य ठाकरे यांनी या कराराचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी चांगलाच फायदा करून घेतला.

आदित्य ठाकरेंचा भन्नाट उपक्रम, जपानच्या सहकार्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविणार 'ही' योजना

आदित्य ठाकरेंचा भन्नाट उपक्रम, जपानच्या सहकार्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविणार 'ही' योजना
जाहिरात

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी तयार केलेली विविध उत्पादने जपानमध्ये विक्रीसाठी पाठविली जाणार आहेत, तसेच जपानमधीलही अशी उत्पादने महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा’ने (एमटीडीसी) निश्चित केलेल्या पर्यटन स्थळांच्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवली जाणार आहेत. त्यामुळे दोन्हीही राज्यांना यासाठी फायदा होईल. परंतु महाराष्ट्रासाठी विशेष फायदा होणार आहे. महाराष्ट्रातील अनेक शेतकरी, महिला बचत गट, फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी यांच्यामार्फत रूचकर खाद्यपदार्थ बनविले जातात. अनेक कलाकुसरींच्याही वस्तू बनविल्या जातात. या वस्तूंना जपानच्या बाजारात अधिक दर मिळणार आहे. त्यामुळे या योजनेचा फायदा राज्यासाठी होईल, असे सूत्रांनी सांगितले.

आदित्य ठाकरेंचा भन्नाट उपक्रम, जपानच्या सहकार्याने राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबविणार 'ही' योजना

जाहिरात

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरेंच्या अभ्यासू मार्गदर्शनावर आयएएस अधिकारीही झाले चकीत

मुख्यमंत्र्यांनी तहसिलदारांना खूर्चीत बसविले, अन् त्यांच्यासोबत फोटो काढला; तहसिलदार म्हणाले, हा अविस्मरणीय क्षण

धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना बजावले, योजना गोरगरीबांपर्यंत पोहोचवा

उद्धव ठाकरे यांनी शिर्डी – पाथरीचा वाद मिटवला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी