36 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
Homeमहाराष्ट्रविंटेज कारसाठी मुंबईत संग्रहालय बनवण्याचा प्रयत्न : आदित्य ठाकरे

विंटेज कारसाठी मुंबईत संग्रहालय बनवण्याचा प्रयत्न : आदित्य ठाकरे

टीम लय भारी 

मुंबई :  पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुंबईतील वरळीमध्ये विंटेज कार रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. या विंटेज कारसाठी एकापेक्षा एक हाच शब्द आहे. कारण काही गाड्या अशासुद्धा होत्या या जगातील एकमेव गाडी असतील. १९१४ मधील एक गाडी यात होती. मेंटेन करणे या गाडया आणि या गाड्या प्रेमाने बनवल्या आहेत. डिझाइन,रंग हे वेगवेगळ्या रंगांचे आहे. जे लोक गाड्यांवर प्रेम करतात त्यांच्यासाठी ही एक चांगली गोष्ट आहे. या सर्व गाड्यांसाठी मुंबईत एक संग्रहालय बनवणार असा आमचा प्रयत्न असून लवकरच याबाबत घोषणा करु असे आदित्य ठाकरे म्हणाले. (Aditya Thackeray’s attempt to set up a museum in Mumbai for vintage cars)

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना भोंगा आणि हनुमान चालीसा प्रकरणावरुन बोलण्यास नकार दिला. त्यावेळी ते म्हणाले की, मुंबईत अनेक गोष्टी चांगल्या होत आहेत. महत्त्वाची गोष्ट हीच आहे मुंबईसाठी, देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी काहीतरी करणे गरजेचे आहे आणि ते आपण करत राहू, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

‘मी संपलेल्या पक्षाला उत्तर देत नाही’

गेल्या अनेक दिवसांसमोर मशिदींसमोर लावणारे भोंगे मनसैनिकांनी आता थेट शिवसेना भवनासमोरच लावले. मनसैनिकांकडून भोंगा लावून हनुमान चालीसा वाजवण्यात आला. रामनवमीचे औचित्य साधून सेनाभवनाच्या समोर भोंगा लावून मनसेकडून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर आता राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिल आहे. ‘मी संपलेल्या पक्षाला उत्तर देत नाही’, असा टोला आदित्य ठाकरे यांनी मनसेला लगावला आहे.


हे सुद्धा वाचा : 

आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या व्हीजनमुळे महाराष्ट्र प्रगतीकडे घोडदौड करत आहे : सुभाष देसाई

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांना भाजपकडून पाच लाख

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्या : नाना पटोले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी