38 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
Homeमंत्रालयशिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होण्यासाठी यंत्रणा सुधारणांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होण्यासाठी यंत्रणा सुधारणांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

टीम लय भारी 

मुंबई: राज्यातील शिक्षकांच्या वेतनप्रश्नांसदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी शाळेतील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होण्यासाठी यंत्रणा सुधारणांचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहे. Ajit Pawar giving order timely payment to it teachers

राज्यातील जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होणे आवश्यक आहे. शिक्षकांच्या वेतनासाठी विलंब होणे चुकीचे आहे. शिक्षकांचे वेतन सेवार्थ प्रणालीद्वारे केले जाते. या सेवार्थ प्रणालीसह इतर यंत्रणातील त्रूटींमुळे वेतन अदा करण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी शिक्षण विभाग आणि वित्त विभागाने समन्वयाने काम करावे, यंत्रणातील त्रुटी दूर करुन आवश्यक त्या तांत्रिक सुधारणा करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

या बैठकीला  शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड, आमदार कपिल पाटील, आमदार अभिजीत वंजारी, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हे सुध्दा वाचा:

ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही :  अजित पवार

महाराष्ट्र की MVA सरकार ने लोगों की मदद के लिए एलपीजी, सीएनजी पर कर में छूट दी है : अजित पवार

‘मविआ भाजप कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवतेय’ : Chandrakant Patil | MVA

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी