32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीयअल्टिमेटम कुणी द्यायचा नाही , अशी हुकुमशाही चालणार नाही :  अजित पवार

अल्टिमेटम कुणी द्यायचा नाही , अशी हुकुमशाही चालणार नाही :  अजित पवार

टीम लय भारी

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 4 तारखेचा अल्टीमेटम दिला होता. यावर अजित पवार यांनी यावर जोरदार निशाना साधला आहे. अल्टिमेटम कुणी द्यायचा नाही… अशी हुकुमशाही चालणार नाही… तुम्हाला अल्टिमेटम द्यायचा असेल तर स्वतः च्या घरात द्या… कायद्याने जे काही आहे ते आम्ही करणार आहोत असा सज्जड इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरे यांना दिला आहे. Ajit Pawar On OBC and Raj Thackeray

यावेळी त्यांनी ओबीसीच्या आरक्षाणावर भाष्य केले. अजित पवार म्हणतात की, विरोधकांचा रडीचा डाव खेळत आहे. ओबीसीबाबत सरकारने योग्य भूमिका मांडली आहे. सभागृहात विरोधकांच्या मदतीने ठराव झाले आहेत. ओबीसींना आरक्षण मिळावे ही सरकारची भूमिका आहे. सुप्रीम कोर्टाने जो काही निकाल दिला आहे.

त्यावर आज बैठक मुख्यमंत्री घेत आहेत. पण शेवटपर्यंत ओबीसींना प्रतिनिधीत्व मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. चांगलं झालं तर आम्ही मिळून केलं आणि चांगलं झालं नाही मग हे सरकारची चूक आहे असे विरोधक ओरडत आहेत सा टोलाही अजित पवार यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा: 

राज्य सरकारने कोणताही कर वाढविला नाही, उलट गॅसवरील कर कमी केला : अजित पवार

Loudspeaker Row: After Raj Thackeray Call to Play Hanuman Chalisa, Hundreds MNS Workers Detained in Maharashtra

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी