राजकीयमहाराष्ट्र

महाराष्ट्रवासियांची एकी कोणीही तोडू शकत नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राची भूमी शूरांची, वीरांची, संत-महात्म्यांची, समाजसुधारकांची भूमी आहे. राज्यातील सर्व नागरिकांना सोबत घेऊन, विकासाची समान संधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही यावेळी अजित पवार यांनी दिली आहे.

टीम लय भारी 

महाराष्ट्रवासियांची एकी कोणीही तोडू शकत नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई:  उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राची भूमी शूरांची, वीरांची, संत-महात्म्यांची, समाजसुधारकांची भूमी आहे. राज्यातील सर्व नागरिकांना सोबत घेऊन, विकासाची समान संधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही यावेळी अजित पवार (Ajit pawar) यांनी दिली आहे. महाराष्ट्राची, महाराष्ट्रवासियांची एकी कोणीही तोडू शकत नाही असा विश्वास व्यक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सहभागी महाराष्ट्रवीरांच्या त्यागाचे स्मरण करुन कृतज्ञता व्यक्त केली.  राज्याचा आर्थिक विकास अधिक गतिमान करण्यासाठी कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण व उद्योग या क्षेत्रांना अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात येत असून यासाठी सुमारे चार लाख कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

पंचसूत्रीच्या आधारावर महाराष्ट्र सर्व क्षेत्रात अग्रेसर राहील. राज्यावरील कोरोना संकटाविरुद्ध महाराष्ट्र एकजूटीने, निर्धाराने लढला आहे, लढत आहे. राज्यातील डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस, अंगणवाडी सेविका, आशाताई, शासकीय कर्मचाऱ्यांनी  जीवाची परवा न करता कोरोनाविरुद्धच्या या लढ्यात योगदान दिले आहे. या सर्व कोरोना योद्ध्यांच्या सेवाकार्याची नोंद इतिहासात नक्कीच होईल, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

कोरोनाच्या संकटकाळात राज्य शासनाने सर्वोच्च प्राधान्य नागरिकांचे जीव वाचवण्याला दिले. प्रसंगी वित्तीय हानी सहन करून मनुष्यहानी टाळली पाहिजे, यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले. राज्याची आरोग्य यंत्रणा अधिक भक्कम करण्यात आली आहे. मात्र हे संकट अजून पूर्णपणे संपलेले नसल्याने सर्वांनी खबरदारी घेण्याचे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

हे सुद्धा वाचा: 

गुणरत्न सदावर्ते हे गुणी बाळ आहेत त्यांच्याबाबत काय बोलणार ? : उदयनराजे भोसले

Why This Division, Asks Ajit Pawar on Raj Thackeray’s Warning Against Use of Loudspeakers at Mosques

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close