30 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeराजकीय‘बंडखोर नेत्याला जनता निवडून देत नाही‘- अजित पवार

‘बंडखोर नेत्याला जनता निवडून देत नाही‘- अजित पवार

टीम लय भारी

मुंबईःराज्यात घडलेल्या महाभारतावर आज अजित पवारांनी समाचार घेतला. आज विधानसभेच्या अधिवेशनात ते बोलत होते. राज्यात बरचं काही घडलं. शिवसेनेचे 40 आमदार अविश्वास दाखवून गेले. त्यामुळे उध्दव ठाकरेंना पद सोडवं लागले. वर वर चांगले दिसतं ,तरी  यापूर्वी जे नेते शिवसेनेतून बंडखोरी करुन बाहेर पडले ते पुन्हा निवडून आले नाही. यावेळी त्यांनी छगन भुजबळ तसेच नारायण राणेंचे उदाहरण दिले. बंडखोर आमदारांना आत्मचिंतन करण्याची गरज आहे असा इशारा वजा सल्ला देखील त्यांनी दिला.

सुरत, गुवाहाटी, गोवा एकदाच फिरुन आलेल्यांवर त्यांनी टीका केली. कविता करणारे शाहजी बापूंना सल्ला दिला. की, मोठी माणसं कधी बाजूला होतील ते तुम्हाला समजणार देखील नाही. फार गांधळून जायचं नाही. गुवाहाटीला डान्स केला. टेबलावर चढून डान्स केला त्यांचा देखील त्यांनी खरपूस समाचार घेतला.अब्ब्दुल सत्तार आणि अॅन्टी चेंबरमध्ये दोन तास एकत्र बसलो होतो. पण त्यांनी सुरतला जाणार असल्याचे सांगितले नाही.आता एकनाथ शिंदेना बाळासाहेब ठाकरेंना दैवत मानून काम करावे लागणार.शिवसेनेच्या नेत्या सोबत शिवैनिक जात नाहीत. आता महापालिका आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत हे पहायला मिळेल.

106 आमदारअसणारी व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही तर 40 आमदार असणारी व्यक्ती मुख्यमंत्री होते. यात काही तरी ‘काळं बेरं‘ आहे असा संशयही आजित पवारांनी यावेळी व्यक्त केला.सगळयांनी आग्रह केल्यामुळे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्विकारली. एकंदरीतच भाजपची स्थापना झाली शिवसेनेची मदत घेवून पक्ष वाढवला. भाजपने ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला.

हे सुध्दा वाचा:

एकनाथरावजी शिंदे तुमच्यावर फार मोठी जबाबदारी! भास्कर जाधव कडाडले

‘फडणवीसांनी अडीच वर्षात सगळी महत्वाची पदं भुषवली‘

सभागृहाला शिस्त लावण्याचे काम अध्यक्षांचे : बाळासाहेब थोरात

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी