30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रखरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही , उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही , उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन

टीम लय भारी

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणी भासणार नाही असे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना नवा व्हेरियंट, एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी आणि भाजपकडून होणाऱ्या मुंबई महापालिकेमधील कोविड घोटाळा आरोपांबाबत आपली प्रतिक्रिया दिली. (Ajit Pawar’s assurance to farmers for rain)

खत, बियाणं जे जे काही शेतकऱ्यांना खरीपरपूर्व हंगामामध्ये लागतं त्या सगळ्याची व्यवस्था केली असून कोणतीही अडचण येणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. या खबरदारीचे नियोजन मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आणि पुण्यात माझ्या उपस्थितीखाली दादा भुसे यांनी घेतलेल्या बैठकीत झाले. यावर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणूनसुद्धा पुण्यात बैठक घेतली. अशाप्रकारे सर्व कृषी विभागाला विश्वासात घेऊन कुठले खत कमी पडतील त्याची मागणीसुद्धा नोंदवली आहे. कुठलीच कमतरता भासणार नाही याप्रकारचं नियोजन राज्यसरकारच्या कृषीविभागाने केले आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

खरीप हंगामात शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही , उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आश्वासन

भाजपकडून मुंबई महापालिकेमध्ये कोविड घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे. मात्र कुठलाही घोटाळाझाला तर त्याची शहानिशा करुन खरोखरच चौकशी होऊन घोटाळा निष्पण्ण झाला पाहिजे. कोणीही आरोप करत, ज्यामध्ये तथ्य नाही, अशा प्रकारचे आरोप केले जातात. तथ्य असेल तर त्याची दखल घेतली जाते, असे अजित पवार म्हणाले.

एमआयएमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शरद पवार यांनी नरेंद्र मोदींसमोर संजय राऊत यांचा मुद्दा मांडला मात्र नवाब मलिक यांना तुरुंगात जाऊ दिलं, असा आरोप केला होता. आम्हाला कुणाचाही विसर पडत नाही. आम्ही कुणाची काळजी घ्यायची असते ती योग्यवेळी घेत असतो, असं म्हणत अजित पवारांनी ओवेसींचे आरोप फेटाळले.

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटबाबत आरोग्य विभागाच्या तज्ज्ञांना चौकशी करायला सांगितली आहे. राजेश टोपे त्या खात्याचे मंत्री आहेत त्यांनाही सांगितले आहे वस्तुस्थिती काय आहे ते पाहा. सोमवारी उद्या मुंबईत गेल्यानंतर त्याबद्दलची इतंभूत माहिती त्याठिकाणी मिळेल आणि जर ती आपल्या सर्व जनतेच्या दृष्टीने गंभीर बाब असेल तर जनतेलासुद्धा त्याबाबतची संपूर्ण माहिती दिली जाईल आणि काय काळजी घेतली पाहिजे , काय खबरदारी घेतली पाहिजे त्याबद्दल त्यांना ज्ञात केले जाईल, असे अजित पवार म्हणाले.


हे सुद्धा वाचा : 

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होण्यासाठी यंत्रणा सुधारणांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

चला करुया संकल्प निरोगी महाराष्ट्राचा अजित पवार यांचे नागरिकांना आवाहन

महाराष्ट्रातील पहिला आदिवासी औद्योगिक समूह दिंडोरीत, अर्थमंत्री अजित पवार यांची अर्थसंकल्पात घोषणा

काँग्रेसने निधी वाटपावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर साधला निशाणा

Objectionable online post against Sharad Pawar by actor Ketaki Chitale unfortunate: Ajit Pawar

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी