33 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीयअजित पवारांचा अजब दावा; म्हणे, एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचे बडे नेते नाहीत

अजित पवारांचा अजब दावा; म्हणे, एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपचे बडे नेते नाहीत

टीम लय भारी

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजप आहे, हे शेंबड्या मुलालाही कळेल. पण या बंडामागे भाजपचे बडे नाहीत, असे अजब वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
मुंबईत पत्रकारांशी ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, खासदार व प्रमुख पदाधिकाऱ्यांची यांची एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी अजित पवार यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजपचे बडे नेते नसल्याचा दावा केला.

विशेष म्हणजे, अजित पवारांनी जेव्हा हे वक्तव्य केले, तेव्हा एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे आमदारांना मार्गदर्शन करीत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहेत. आपल्याला एका राष्ट्रीय पक्षाचा पाठींबा असल्याचे ते सगळ्या आमदारांना सांगत आहेत.दुसऱ्या बाजूला काँग्रेस, राष्ट्रवादीतील अन्य नेतेही या बंडामागे भाजपचाच हात असल्याचा दावा करीत आहेत.दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले की, माझी मीडियाला विनंती आहे की, ‘महाविकास आघाडी’ सरकारला पाठिंबा देण्याचीच राष्ट्रवादीची भूमिका आहे. याच्यापेक्षा वेगळी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची नाही. शिवसेनेत जे प्रश्न निर्माण झाले आहेत, ते शिवसेनेचे प्रवक्ते सांगतील.
सरकारमधून बाहेर पडण्याबाबत संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य हे त्यांच्या पक्षांतील अंतर्गत बाब आहे, असे ते म्हणाले.
विकासासाठी निधी देताना कोणत्याही आमदारावर अन्याय केलेला नाही. सरकार अडीच वर्षे सत्तेत आले होते. १/३ पालकमंत्री तिन्ही पक्षांचे नेमले होते. अर्थसंकल्पात केलेली तरतूद, आमदार निधी, डोंगरी निधी, डीपीडीसी निधी मुबलक दिलेला आहे. मी कधीही दुजाभाव केला नसल्याचा दावा, अजित पवार यांनी यावेळी केला.
तरीही काही आमदारांची नाराजी असेल तर त्यांनी आम्हाला सांगायला हवे होते. आम्ही प्रमुख नेते एकत्र बसायचो. त्यावेळी आम्ही एकत्रपणे बसत असतो. त्यावेळी सांगितले असते तर, गैरसमज दूर झाले असते, असे अजित पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा : AUDIO CLIP : अबब ! फुटलेल्या आमदाराला 50 कोटीची ऑफर, ऑडीओ क्लिप व्हायरल

बंडोपंतांच्या गोटातून परत आलेले आमदार खोटं बोलत असल्याचा तानाजी सावंत यांचा आरोप

EXCLUSIVE : एकनाथ शिंदेंची भूक वाढली, भाजपकडे केली मुख्यमंत्रीपदाची मागणी

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी