28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeक्राईमअबब ! दारूचा गैरधंदा करणारे २५ हजार जण अटकेत

अबब ! दारूचा गैरधंदा करणारे २५ हजार जण अटकेत

टीम लय भारी

मुंबई : कायदा धाब्यावर बसवून, तसेच सरकारची नजर चुकवून दारूचा काळाबाजार करणाऱ्या तब्बल २५ हजार ५६९ जणांवर तुरूंगवारीची वेळ आली आहे. ‘महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क खात्या’च्या धडक कारवाईमुळे या समाजद्रोह्यांवर कारवाई झाली आहे.( Alcohol traffickers arrested 25,000)

गेल्या वर्षातील १ एप्रिल ते ३१ डिसेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत ही कारवाई करण्यात आली आहे. हातभट्टीची दारू बनविणे, बनावट दारू तयार करणे, ताडी बनविणे, परराज्यातून दारू आणणे किंवा बाहेर घेऊन जाणे, बेकायदा दारू विक्री करणे… इत्यादी गैरप्रकार करणाऱ्यांवर ही कारवाई केल्याचे उत्पादन शुल्क खात्यातील उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

हे सुद्धा वाचा

शाब्बास रोहित… खूप खूप अभिनंदन; रोहित पवारांकडून रोहित पाटीलांचे अभिनंदन

शिवसेनचा धक्का, नितेश राणेंच्या हातून देवगडमधून गेली सत्ता

कवठेमहांकाळमध्ये रोहित पाटलांची एकहाती सत्ता

Gutkha, tobacco worth ₹43L seized in Navi, 7 arrested

ही कारवाई करताना तब्बल २ हजार ४८७ वाहने व ११३ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. सर्वाधिक गुन्हे नागपूर विभागात झाले आहेत, तर सर्वात कमी गुन्हे नाशिक विभागात झाले आहेत. विशेष म्हणजे, कोरोना संकटकाळातही दारूचा काळाबाजार करणाऱ्यांनी आपले धंदे तेजीत ठेवल्याचे या आकडेवारीवरून दिसून येत आहे.

अटक झालेल्यांची विभागनिहाय आकडेवारी

कोकण (मुंबई, पालघर, रायगड, ठाणे)– ४३७३

पुणे (अहमदनगर, पुणे, सोलापूर) – ३८८३

कोल्हापूर (कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदूर्ग) – ३३३६

नाशिक (धुळे, जळगाव, नंदूरबार, नाशिक) – १९०७

औरंगाबाद (औरंगाबाद, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी) – ४४९६

नागपूर (अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ – ७३३१

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी