29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयअमोल कोल्हेंनी विलासराव देशमुख यांच्यासोबतच्या आठवणींना दिला उजाळा

अमोल कोल्हेंनी विलासराव देशमुख यांच्यासोबतच्या आठवणींना दिला उजाळा

टीम लय भारी

मुंबई: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा आज स्मृतिदिन आहे. विलासराव देशमुख हे उत्कृष्ट लोकनेते होतेच पण ते एक उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी मोठ्या नेत्यांनी त्यांना अभिवादन केले आहे. विलासराव देशमुख यांना अभिवादन करत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी एक खास पोस्ट करत आठवणींना उजाळा दिला आहे (Amol Kolhe has reminisced with Vilasrao Deshmukh). 

विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी अमोल कोल्हे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेर केली आहे. यात ते म्हणाले, ‘राजा शिवछत्रपती’ मालिकेच्या उद्घाटनप्रसंगी 25 ऑक्टोबर 2008 साली विलासराव देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी विलासराव देशमुख यांच्या हस्ते माझा सत्कार झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेच्या वेशभूषेत विलासराव देशमुखांच्या हस्ते माझा हा पहिला आणि शेवटचा सत्कार झाला होता.

अमोल कोल्हे म्हणतात, उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय नेतृत्व केले, तर अभिमान असेल, पण….

सध्या देशाला नव्या संसद भवनाची नाही, उपाय योजनांची गरज, अमोल कोल्हे बरसले

या उद्घाटनप्रसंगामुळे आयुष्यात पहिल्यांदाचं विलासराव देशमुख यांची भेट झाली होती. त्या भेटीची आठवण कायम मनात घर करून गेली. अशा लोकनेत्यास विनम्र अभिवादन, अशी पोस्ट अमोल कोल्हे यांनी केली आहे.

Amol Kolhe has reminisced with Vilasrao Deshmukh
विलासराव देशमुख यांच्या हस्ते अमोल कोल्हे यांचा सत्कार

या पोस्ट मध्ये अमोल कोल्हे यांनी त्या प्रसंगी काढलेला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये विलासराव देशमुख हे अमोल कोल्हे यांचा सत्कार करत आहेत. विलासराव देशमुख यांच्यासोबत या कार्यक्रमात युवराज संभाजीराजे छत्रपती हे देखील उपस्थित होते (Amol Kolhe shared a photo taken on the occasion).

कोरोना काळात राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवून द्या, अमोल कोल्हे कडाडले

Riteish Deshmukh and Genelia D’Souza remember former Maharashtra CM Vilasrao Deshmukh in a heartfelt post

सरपंच ते मुख्यमंत्री अशी कारकीर्द

वयाच्या 29 व्या वर्षी विलासराव देशमुख हे लातूर येथील बाभळगावचे सरपंच झाले होते. 1974 ते 1980 दरम्यान लातूर पंचायत समितीच्या उपाध्यक्षपदाचा कार्यभार त्यांनी सांभाळा होता.

1980 ते 1995 पर्यंत सलग तीनदा विधानसभेवर आमदार झाले. 1995 मध्ये पराभूत झाले. 18 ऑक्टोबर 1999 ते 17 जानेवारी 2003 पर्यंत विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळी होती. नोव्हेंबर 2004 मध्ये विलासराव देशमुख दुसर्‍यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. दोन वेळेस महाराष्ट्राचे, मुख्यमंत्री त्यानंतर केंद्रात मंत्री अशी विलासरावांची कारकीर्द आहे (Vilasrao Deshmukh has a career from Sarpanch to Chief Minister).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी