महाराष्ट्रराजकीय

OBC आरक्षणाचा खून पडल्यास देवेंद्र फडणवीस जबाबदार : अमोल मिटकरी

महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी दिले होते. यावरुन भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. यावर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी सध्याचा विरोधी पक्षावर निशाणा साधत आहे. गेल्या टर्ममध्ये भाजप देवेंद्र फडणवीस सत्ते होते. तेव्हा OBC आरक्षणाचा खून झाली अशी टीका त्यांनी केली आहे.

टीम लय भारी

OBC आरक्षणाचा खून पडल्यास देवेंद्र फडणवीस जबाबदार : अमोल मिटकरी

मुंबई:  महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने काही दिवसांपूर्वी दिले होते. यावरुन भाजप आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. यावर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (amol mitkari)  यांनी सध्याचा विरोधी पक्षावर निशाणा साधत आहे. गेल्या टर्ममध्ये भाजपचे देवेंद्र फडणवीस सत्ते होते. तेव्हा OBC आरक्षणाचा खून झाला अशी टीका मिटकरी यांनी केली आहे. amol mitkari on obc reservation

आमदार अमोल मिटकरी (amol mitkari)  यांनी ट्विट करत OBC आरक्षणावर भाष्य केले आहे. अमोल मिटकरी म्हणतात की, भाजपा व देवेंद्र फडणवीस यांची आरक्षणामागची कपटनीती समजून घेणे आवश्यक आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा समाजासाठी SEBC आरक्षणाचा कायदा मंजूर करून घेतला. आरक्षण हा केंद्र सरकारचा विषय असल्याने या प्रक्रियेत फडणवीस सरकारने मोदी सरकारला सामील करून घेणे आवश्यक होते तसे झाले नाही.

SEBC ला (मराठा आरक्षणाला बेताल विरोध करणाऱ्या सदावर्ते च्या माध्यमातुन) फडणविसांनी योजनेने उच्च न्यायालयाच्या कसोटीवर आणले. तिथे SEBC आरक्षण वैध ठरले. खरं तर केंद्र सरकारने EWC चा पर्याय निर्माण केला असताना SEBC चा आग्रह कशासाठी ? तो उघडा का पाडल्या गेला नाही?

मात्र यातही केंद्र सरकारच्या दबावाने आपल्या सोयी चा निकाल लावून विधानसभा निवडणूक जिंकायची या कपट हेतुने ओबीसी व मराठा आरक्षणाचा फक्त राजकीय वापर करण्यात भाजपा व देवेंद्र फडणवीस यांचा डाव यशस्वी झाला.

गेली वीस वर्ष OBC जनगणनेची मागणी OBC बांधव व संघटना करत आहेत.२०१९ विधानसभा निवडणुकीच्या २ महिन्यापूर्वी देवेंद्रजीनी मुख्यमंत्री म्हणून केंद्राकडे ‘इम्पिरिकल डेटा’ मागितला तेव्हा केंद्रीय सा.न्या.मंत्री श्री रामदास आठवले यांनी “चुका दुरुस्त करून पाठवा” असे उलट टपाली कळविले होते.

या ईम्पिरिकल डेटा साठी न्यायालयाने तात्कालीन राज्य सरकारला ८ आठवड्याची मुदत दिली होती. मात्र फडणवीस सरकारने या मुदतीत केंद्राकडे चुका दुरुस्त करून न पाठवल्याने OBC आरक्षणाचा खुन झाला. त्यास सर्वस्वी देवेंद्र फडणवीस व भाजपा जबाबदार आहे आणि तेच आज OBC आरक्षणासाठी मोर्चे काढत आहे. अशी टीका मिटकरी यांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा: 

बारामतीचा गडी एवढा हुशार कसा?, सदाभाऊंचा शरद पवारांवर निशाणा

Maharashtra BJP protest against MVA govt for conspiring to remove OBC reservation

Tags

आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close