28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीबांसाठी भोजनाचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीबांसाठी भोजनाचे आयोजन

टीम लय भारी

धुळे : राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल गोटे (Anil gote) यांचा आज (ता. २४ मे) वाढदिवस आहे. त्यानिमित्त धुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव वामन तात्या मोहिते यांनी मोफत भोजनाचे आयोजन केले आहे.वामन तात्या मोहिते हे शिवभोजन योजनेचा स्टॉल चालवतात. योजनेतील विशिष्ठ संख्येतील थाळींच्या पलिकडे जावून ते आज गोरगरीब व सामान्य लोकांना मोफत भोजन पुरविणार आहेत. आमचे नेते अनिल गोटे हे नेहमी गोरगरीब व सामान्य लोकांच्या मदतीला धावून जात असतात. Anil gote Birthday celebrations

लोकांच्या मदतीसाठी ते तत्पर असतात. गोटे साहेबांच्या या स्वभावाच्या अनुषंगानेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त धुळ्यातील सामान्य व गरीब लोकांना मोफत भोजन पुरविण्याचा मी निर्णय घेतला असल्याचे वामन तात्या मोहिते यांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.
दरम्यान, अनिल अण्णा गोटे हे शक्यतो वाढदिवस साजरा करीत नाहीत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीबांसाठी भोजनाचे आयोजन
श्री. अनिल अण्णा गोटे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. प्रशांत भदाणे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसाचे अवडंबर माजवायला त्यांना आवडत नाही. तरीही कार्यकर्ते व हितचिंतक यांनी कालपासून गोटे (Anil gote) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फोन व मेसेजेस केले आहेत. कार्यकर्त्यांचा आग्रह लक्षात घेऊन गोटे साहेब आज सायंकाळी मल्हार बागेत (धुळे) उपस्थित राहून सर्वांच्या शुभेच्छांचा स्विकार करणार आहेत, असे सोशल मीडिया प्रमुख अविनाश लोकरे यांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीबांसाठी भोजनाचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीबांसाठी भोजनाचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीबांसाठी भोजनाचे आयोजन

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीबांसाठी भोजनाचे आयोजन

हे सुद्धा वाचा: 

‘हनुमान चालिसा सोडून पेट्रोल – डिझेलवर बोलतायत हे नसे थोडके’ जितेंद्र आव्हाडांचा फडणवीसांना टोला

Chhattisgarh Chief Minister E-Transfers 1,804 Crore Under 3 Major Schemes

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी