32 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमहाराष्ट्रबांगलादेश मुक्ती लढ्यात नरेंद्र मोदी सहभागी होते, तर बाबरी मस्जिद पाडण्यात फडणवीस...

बांगलादेश मुक्ती लढ्यात नरेंद्र मोदी सहभागी होते, तर बाबरी मस्जिद पाडण्यात फडणवीस निश्चितच अग्रेसर होतेच : अनिल गोटे

टीम लय भारी 

मुंबई:  राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी आपल्या पत्रात भारतीय जनता पक्ष म्हणजे अत्यंत लबाडांचा व ठरवून खोटे बोलणाऱ्यांची मोठी टोळी आहे असा उल्लेख केला आहे. Anil Gote criticize Raj Thackeray and Devendra fadnavis

बांगलादेशाच्या मुक्ततेसाठी एकही आंदोलन झालेच नाही! तरी सुध्दा देशाचे पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी यांनी बेधडकपणे सांगून टाकले की, “बांगलादेशाच्या सत्याग्रहात मी होतो. एवढ्यावरच न थांबता पुढे म्हणाले की, “आंदोलक म्हणून जेलमध्ये पण मी होतो” मुक्ती आंदोलनाच्या वृत्तसंकलनाकरीता कै. बंडोपंत तथा दि. वि. गोखले, विसुभाऊ देवधर, प्रल्हाद लंगोटे या पत्रकारांबरोबर सहभागी होण्याचे भाग्य मलाही लाभले. बांगलादेश स्वातंत्र्य लढ्यात आपण एक आंदोलक होतो असे मोदीनी जाहिर वक्तव्य करताच मला तर, धक्काच बसला. (Anil Gote)

देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या व्यक्तीच्या तोंडातून निघालेला शब्द अंतिम सत्य मानले जाते. आमच्या देशात तर, देशाच्या पंतप्रधानांनी अंतिम असत्य बोलण्याचा विडाच उचलला आहे. आई-वडिलांच्या माराच्या धाकाने अजाण बालके सुध्दा एवढे खोटे तर बोलत नाहीत. Anil Gote criticize Raj Thackeray and Devendra fadnavis

 भारतीय जनता पक्षात खोटे बोलण्याची स्पर्धाच लागली आहे. जास्तीत जास्त खोटे कोण बोलतो? याची स्पर्धा पक्षांतर्गत लागली आहे की काय, असे वाटते. बाबरी मस्जिद पतनाचे वेळी आपण “मशिदीच्या घुमटावर होतो” बिनधास्तपणे असे धडधडीत खोटे माजी मुख्यमंत्री भाजपा नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. सद्य:स्थितीत देवेंद्रजी अहंकाराच्या दर्पातून विरोधी पक्ष भोगत आहेत. Anil Gote criticize Raj Thackeray and Devendra fadnavis

अत्यंत खोटे  वक्तव्य करुन लबाड बोलण्यात आपण पंतप्रधानपेक्षा कमी नाही हेही दर्शवून दिले. बाबरी मजिस्द पतनाची जुनी छायाचित्रे व तत्कालीन विडियो क्लिप मी फार बारकाईने पाहिल्या. एकाही छायाचित्रात किंवा व्हिडियो क्लिपमध्ये देवेन्द्र फडणवीसाच्या शरीरयष्टीशी साधर्म्य असणारी एकही व्यक्ती आढळून येत नाही की, कोणाच्या मागे लपले जावू शकतील.

या पत्रात त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. गोटे (Anil Gote) म्हणतात की, मनसेचे नेते राज ठाकरे यानी भगवी शाल पांघरुन आपण प्रति बाळासाहेबच आहोत असे दर्शविण्याचा प्रयत्न केला. पण बाळासाहेब पुन्हा होणे नाही. वाघ फक्त वाघच असू शकतो, वाघाचे कातडे पांघरल्याने अन्य कुठलेही गाढव वाघ होत नाही. भगवी शाल पांघरली म्हणून राज ठाकरे कदाचित बाळासाहेब सदृश्य दिसतही असतील, पण झेरॉक्स प्रमाणपत्राची सत्यता मूळ ओरिजनल प्रमाणपत्राइतकी असतच नाही अशी जहरी टीका अनिल गोटे यांनी केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांची तोंड फाटेस्तवर स्तुती करणारे राज ठाकरे गेल्या दोन-तीन सभांपासून शरद पवार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत नाहीत शाहू, फुले आंबेडकरांचेच नाव घेतात. अशी आदळआपट राज ठाकरेंनी सुरु केले आहे. देशात गरीब, दलीत, दीन दलीत, पददलित, मागासवर्गीय आणि दुर्बल वर्गाचे राजकारण करायचे असेल तर फुले, आंबेडकरांच्या विचाराशिवाय अन्य कुठलाच पर्याय नाही असं गोटे (Anil Gote) म्हणाले.

राज ठाकरेंनी भलेही उच्च वर्णीयांची भलावण करावी, पण मागासवर्गीय, दलीत, दीनदुबळ्यांच्या दैवतांचा अपमान तरी करु नये. प्रबोधकरांचे जसे राज ठाकरे वारस आहेत, तसे उध्दव ठाकरेही आहेत याचा विसर पडता कामा नये. अन्यथा, “ये पब्लिक है, ये सब जानती है असा सल्ला ही अनिल गोटे यांनी राज यांना दिला आहे. Anil Gote criticize Raj Thackeray and Devendra fadnavis

हे सुद्धा वाचा: 

वांद्रे येथील शासकीय भूखंडाचा कोट्यवधीचा घोटाळ्या संदर्भात प्रविण दरेकरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

“We Don’t Stand With Murderers”: Asaduddin Owaisi On Hyderabad Killing

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी