29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्र'कोल्हापूरात कुणी हुंगत नसलेले चंद्रकांत पाटील दिवसाढवळ्याच बरळून राजकारणातील विनोदी विषय ठरलेत'

‘कोल्हापूरात कुणी हुंगत नसलेले चंद्रकांत पाटील दिवसाढवळ्याच बरळून राजकारणातील विनोदी विषय ठरलेत’

टीम लय भारी 

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन खोचक टीका केली होती. “घरी जाऊन स्वयंपाक करा. तसेच कुठेही जा मसनात जा, पण आरक्षण द्या”, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष अनिल गोटे (Anil Gote) यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. कोल्हापूरात कुणी हुंगत नसलेले चंद्रकांत पाटील दिवसाढवळ्याच बरळून राजकारणातील विनोदी विषय ठरलेत असा खोचक टोला अनिल गोटे यांनी लगावलाय. (Anil Gote criticizes Chandrakant Patil over obc reservation)

भाजपा कार्यालयापासून मंत्रालयाचे केवळ 150 मिटर आहे. एवढ्या अंतरासाठी राज्यभरातून ओ.बी.सी. आयात केले होते. वृत्त वाहीन्यांच्या प्रतिनिधी समोर कायम वाचळपणे बोलून राजकारणातील विनोदाचा विषय ठरलेले अपघाती नवराजकारणी चंद्रकांत पाटील दिवसाढवळ्याच बरळले. यांची पात्रता काय तर, कोल्हापुरात यांना कुणी हुंगत नाही. प्रत्यक्ष कोल्हापूरच्या राजकारणात यांना कुणी दखलपात्र मानत नाही. असे रणछोडदास चंद्रकांत पाटील उर्फ चं. पा. पुण्यातील मेघाताई कुलकर्णी यांनी अहोरात्र कष्ट उपसून सुरक्षीत केलेल्या कोथरूड मतदार संघात घुसखोरी करून विधानसभेवर आले. कोथरूड मतदार संघातील जनतेला न्याय मिळावा, त्यांचे प्रश्न निकाली निघावेत यासाठी पायाला भिंगरी बांधल्याप्रमाणे आमदार मेघाताईंना फिरतांना मी स्वतः पाहिले आहे. त्यांच्या मतदार संघातील एका विषयावर विधानसभा अध्यक्षांनी त्यांना बोलू दिले नाही तेंव्हा त्या संतापाने आक्षरश: थरथरत होत्या. डोळ्यातून अश्रू बाहेर पडत होते. इतक्या संवेदनाशील महिलेचा हक्क हिरावून घेवून चं. पां.नी दंडेली करून घुसघारी केली. राजकारणातील ही यांची औकात ! लायकी ! पात्रता ! अशा या शूर, वीर, मर्द चंद्रकांत पाटलांनी व दुसरे नेते देवेंद्र फडणवीसांनी आपल्या टोळीतील अन्य चिरकूट सदस्यांसह सरकार पाडण्याचे अखंड अयशस्वी प्रयत्न केले मुहूर्तामागून मुहूर्त निघून गेले, असे अनिल गोटे म्हणाले.

सरकार पडणे तर सोडाच तर, नुसते हलले सुध्दा नाही. कधी हिंदुत्वाचा D.N.A. कधी ओबीसींचा D.N.A. कधी मराठ्यांचा D.N.A. तर कधी आदिवासी दलीत असा सतत डी.एन.ए. बदलणाऱ्या भाजपा नेत्यांच्या हाती म. वि. आघाडी सरकारचा बालसुध्दा लागला नाही. राजकारणातील नवखेपणा, अनुभवशून्य डावपेंच अन् उथळ विचार, वाचाळपणा व खुशमस्कऱ्यांच्या वेढ्यात स्वतःला धन्य समजून घेणारे बालीश नेतृत्व सरकार काय पण ग्रामपंचायतीत सरपंच सुध्दा उतरवू शकत नाहीत. बाहेरच्या पक्षातून आयात केलेल्या आयतोबांनी आपल्याला सोडून जावू नये यासाठी गाजर, मुळे, रताळे दाखविण्याची व अश्वासनांची हूलबाजी फारकाळ टिकू शकत नाही. फक्त निवडणुका लागूच द्या ! “ढुंढते रह जावोगे”, असे अनिल गोटे म्हणाले.

एकाच मतदार संघातून लोकसभेवर सतत निवडून येणे सोपे नाही. स्वकर्तृत्वावर जिल्हा परिषदेवर निवडून येण्याची पात्रता नसलेल्यांना हे कळणार तरी कसे? अशा सुप्रिया ताईंना “तुम्ही घरी बसा ! अन् स्वयंपाक करा” असा सल्ला दिला. चंद्रकांत पाटलांच्या या वैतागाला वरील पार्श्वभूमी आहे. नवरा अपघाताने व कुणाच्या तरी आर्शिवादाने आश्रीत मुख्यमंत्री झाला. त्याची काही एवढ्या भांडवलावर यांना काही धरबंद नाही. अखेर देवेंद्र फडणवीसांनाच जाहीर कबुली द्यावी लागली. ” माझी बायको माझ ऐकत नाही” फडणवीसांची पती म्हणून ही हतबलता फारच केविलवाणी आहे, असे अनिल गोटे म्हणाले.

अमृता वहिनी कधी गातात, कधी अभिताभ बच्चन समवेत नाच करतात. तर, कधी कॅलीफोर्नियाला जातात आपल्या वस्त्रपरिधानाच्या लालसेपोटी आकर्षणाचे केंद्र ठरतात. आता तर त्यांनी कहरच केला कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावली. एवढेच नव्हे तर कधी कंगना रणावतवर कधी आर्यन खानवर तर, कधी राज्याच्या मुख्यमंत्र्यावर ट्वीट करून त्यांच्या लहरीप्रमाणे आपली मते व्यक्त करीत असतात. माझा चंद्रकांत पाटलांना सरळ सवाल आहे की, अमृता ताईंना घरी बसा स्वयंपाक करा पोरे सांभाळा संसार करा असा सल्ला देण्याची तुमच्यात हिंम्मत आहे का ? खरच हिंम्मत असेल तर जरा असा अनाहूत सल्ला देउन तर बघा ! तुमचे काय हाल होतात हे महाराष्ट्र पाहीलच सुप्रिया ताईंवर त्यांच्या आई वडीलांचे सभ्यतेचे संस्कार झाले आहेत. एका मर्यादेपेक्षा त्या जास्त कठोर बोलू शकणार नाहीत, असे अनिल गोटे म्हणाले.

मनाची नाही तर जनाची तरी लाज बाळगा! सिल्व्हर ओक वर भाजपा पुरस्कृत मोर्चा आला असतांना एवढ्या संतप्त जमावा समोर जिवाची पर्वा न करता मोर्चाला सामोरे जावून कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता सामंजस्याने व अत्यंत संयमाने मोर्चेकऱ्यांना विणवून विणवून सांगत होत्या. हे सर्व महाराष्ट्राने पाहिले आहे. संस्कार संस्कार म्हणतात ते यालाच, असे अनिल गोटे म्हणाले.

तुम्हा सर्वांची वाचाळता जगजाहीरच आहे. बारामतीत पराभव करू! याँव करू त्याँव करू नको तेवढे बोललात पण शेवटच्या क्षणी पूर्ण फाटली. उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील सरकार किमान शंभर वेळा तरी स्वप्नात पाडून झाले. तुमची शपथ विधी सुरू असल्याची सुखद स्वप्ने पाहून झाली पण आमच्याकडे एक म्हण आहे. “मन्या मामान्या शंभर गाई सकाय उठी काही नाही” इतके तुम्ही हास्यास्पद झालेला आहात. राष्ट्रवादीशी युती करणार नाही, असे अनिल गोटे म्हणाले.

आपण धर्म म्हणून नाही ! शाश्वत धर्म म्हणून नाही ! नाही ! नाही ! ओरडून सांगणाऱ्या फडणवीसांनी सत्तेच्या लालसेपोटी केलेला उतावीळपणा सर्व महाराष्ट्राने पाहीला आहे. महाराष्ट्र साखर झोपेत असतांना माननीय अजित पवारांबरोबरच सरकार स्थापन केले व “आमचेच थुकलेले आता आम्ही कसे चाटतो बघा !” हे महाराष्ट्राला दाखवून दिले आधीची तुमची अवस्था सहन होत नाही अन् सांगताही येत नाही. अशी झाली आहे. अशी अवस्था होण्याच्या कारणांचा आंतर्मुख होवून विचार करा ! मी तर फटकळ आहेच ! पण ज्याच्याशी मैत्री करायची तर त्याच्याशी जीवापाड ! दुष्मनी करायची तर टोकाची ! माझ्याकडे दोनच रंग आहेत ! व्हाईट अँड ब्लॅक नो ग्रे !, असे अनिल गोटे म्हणाले.


हे सुद्धा वाचा : 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल गोटे यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीबांसाठी भोजनाचे आयोजन

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अनिल गोटे यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रम; अनाथ, गोरगरीब, वृद्ध, अपंग यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप 

बांगलादेश मुक्ती लढ्यात नरेंद्र मोदी सहभागी होते, तर बाबरी मस्जिद पाडण्यात फडणवीस निश्चितच अग्रेसर होतेच : अनिल गोटे

अनिल गोटे यांचा भाजपला ‘वात्सल्य’युक्त टोला !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी