30 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयभाजप सत्तेसाठी महेबुबा मुफ्ती बरोबर गेले,उद्या तालीबान्यांबरोबर युती केली तरी आश्चर्य नाही...

भाजप सत्तेसाठी महेबुबा मुफ्ती बरोबर गेले,उद्या तालीबान्यांबरोबर युती केली तरी आश्चर्य नाही : अनिल गोटे

टीम लय भारी  

मुंबई : विधान सभेच्या सार्वत्रिक निवडणूकीपुर्वी देवेंद्र फडवणीसांना भविष्यात राष्ट्रवादी सोबत युती करणार का ? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांनी दिलेल्या उत्तरावर माजी आमदार अनिल गोटे (Anil gote) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.रंग बदलण्यात फडणवीसांनी सरडयाचाही पराभव केला. भाजपचे सत्तेसाठी महेबुबा मुफ्ती बरोबर दिवस गेले. उद्या तालीबान्यांबरोबर युती केली तरी आश्चर्य वाटणार नाही.आकस्थाळेपणा केल्याने भक्त टाळया वाजवतील बाहेर मात्र शिव्या घालतात. प्रश्नाच्या उत्तरात आपण बोलतो ते खरे वाटावे यासाठी ‘राष्ट्रवादीशी युती नाही. शाश्वत धर्म म्हणून नाही’ असे फडवणीसांनी बेंबीच्या देठापासुन चिरक्या आवाजात ओरडून सांगितले.राजकारणात असंख्य ढोंग करणारी असंख्य विदुषके गेल्या ५५ वर्षात पाहिलीत. पण देवेंद्र फडवणीस (Devendra fadnavis) म्हणजे या सम हाच, असे राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष व भाजपाचे माजी आमदार अनिल गोटे यांनी भाजपाला खडे बोल सुनावले.(Anil gote criticizes fadnavis)

तेव्हा कृष्ण होते, आता शकुनी झाले काय ?…

आपत धर्म म्हणून नाही ! भविष्यात नाही ! नाही !! नाही !!!” अर्थात देवेंद्र फडविसांना नखशिखांत ओळखणाऱ्या माझ्या सारख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या लोकांना कल्पना होती की, वेळ पडली तर, सत्तेसाठी फडवणीस लाळ गळेस्तोवरत बुट चाटल्याचशिवाय राहणार नाही. नेमके घडले ही असेच ! सभागृहात ज्यांचा शकुनी म्हणून उल्लेख केला पण मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी याच शकुनीला रात्री उरावर घेतले. तेव्हा गोड वाटल ! मजा आली ? भल्या पहाटे कोश्यारी नावाच्या पुरोहिताकडून मोहतर लावून घेतला. राष्ट्रवादी काँग्रेसने डाव टाकुन फडणवीसांची सत्तेची खाजला मिटवली. राज्यात असलेली राष्ट्रपती राजवट अलगद उठवून घेतली. संपुर्ण वस्त्रहीन झाल्यानंतरच फडवणीसांना “बडे बेआब्रु होकर तेरे कुचुसे निकले” असेच म्हणावे लागले. राष्ट्रवादीने धोबी पछाड मारली. फडणवीसांना लक्षात आले की “रिश्ते मे हम तुम्हारे बाप लगते है, नाम है बारामती के पवार” त्याचा संताप आणि आकस्थाळेपणा विधानसभेत केलेल्या थयथयाटातुन महाराष्ट्राला दिसला . राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष व भाजपाचे माजी आमदार अनिल गोटे (Anil gote) यांनी आज एका पत्रकाव्दारे देवेंद्र फडवणीसांना टोला लगावला आहे.

फडवणीसांच्या बोलण्यात काही तथ्य नव्हते

आपल्या पत्रकात ते पुढे म्हणतात की, ‘फडवणीसांच्या उत्तराच्या भाषणात ओढून ताणून काही तरी बोलायचे म्हणून बोलत होते. त्या बोलण्यात काही तथ्य नव्हते. राष्ट्रवादी व भाजपा अशी सत्ता समीकरणे त्यांना आवडली होती. पण राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणजे महापातक ! खरे तर, शरद पवार व उध्दव ठाकरेंनी अशी बेमालूम खेळी केली की, उताणे पडल्यावरच फडणवीसांना कळाले गिरे तो मी नाक उप्पर ! पीठ जमीन को लगी तो क्या हुआ ? नाक तो उपर है ना ! असे वाटल्यास नवल ते काय? १३० कोटी जनतेसमोर बोलता बोलता आपल्याला हातो- हात उलट केले. त्यांना झालेल्या जन्मभराच्या राजकीय जखमेवरील खपली निघाल्याने भळभळून वाहणारे रक्त म्हणजे विधान सभेत केलेले भाषण होते.

तेली ले धारोधार, खुदा ले एकही बार

 असो ! विदर्भात एक म्हण प्रचलीत आहे.“तेली ले धारोधार, खुदा ले एकही बार” !विरोधापक्ष नेते आपल्या भाषणात म्हणाले की, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही ! तुम्ही म्हणजे मुंबई नाही ! वगैरे वगैरे फडवणीसांचा हा दावा मला मंजूर आहे. पण तुम्ही म्हणजे हिंदु नाही ! मेहबुबा मुफ्तीच्या चरणी जावून सत्तेसाठी लाळ गाळणारे हिंदु कसे असू शकतात ? महाराष्ट्रात सत्तास्थापनेच्या दरम्यान फडवणीसांनी केवळ दोन आमदारांसाठी एम.आय.एम. शी मध्यरात्री गुफ्तगु करून युती केली. त्या पोटी काही बिदाजी ध्यायची ती दिली गेली होती. इमानदारीच्या रक्ताचा एक थेंब जर बाकी असेल तर त्यांनी खर सांगाव ! राजकारणात कुणी कायमचा शत्रू अथवा मित्र असत नाही ! तुम्ही केले तर अस म्हणायच ! पण एक मात्र निश्चित तुम्हीच इनकम टॅक्स ! तुम्हीच सी. बी. आय ! तुम्हीच इ.डी ! तुम्हीच घरगडी ! त्वमेव इडी ! त्वमेव घरगडी ! त्वमेव सर्वम् !, असे अनिल गोटे (Anil gote) म्हणाले.

नैसर्गिक संकटात महाराष्ट्राला केंद्र सरकारने एक पैसा दिला नाही

महाराष्ट्र प्रेमाची तुमची नेमकी व्याख्या तरी काय ? याचा खुलासा कराच ! माझे जाहीर आवाहन आहे ! तुम्ही आव्हान समजत असाल तर आव्हान आहे. महाराष्ट्रातील असंख्य प्रकल्प गुजराथला नेले तुम्ही कधी तरी थोबाड उघडल का ? राज्यावर कोवीडच संकट आल ! भाजपाने महाराष्ट्रात एक रूपया न ठेवता. सर्व शहा- शहेनशहांच्या चरणी दिल्लीत अर्पण केले. पंतप्रधान निधी ! कुठेही कसलीही नोंद नाही ! हिशोब देण्याचे बंधन नाही ! जनतेचा पैसा म्हणजे आपल्या बापजाद्याची इस्टेट ! पुनश्च म. वि. आ. सरकारला प्रश्न विचारालया निर्लज्जपणे व कोडगेपणाने तयार ! सरकारने राज्यात काय केले? तुम्ही कोवीड काळात सरकार विरोधी आंदोलने केली! इकडे राज्यात लोक मरताहेत! तुम्ही मात्र बोंबा मारून होळी साजरी करताय ! हेच तुमचं महाराष्ट्र प्रेम काय ? नैसर्गिक संकटात महाराष्ट्राला केंद्र सरकारने एक पैसा दिला नाही. नैसर्गिक संकट येताच मोदी गुजराथमध्ये येवून खमण ढोकळे खावून गेले. दिल्लीला परत जातांना महाराष्ट्राच्या सीमेवरून गेले. पण राज्याकडे ढुंकून पाहिले नाही. तुमचे सुध्दा हाताची घडी अन तोंडावर बोट ! आपण राज्याचे नेते म्हणून एक शब्दाने तरी पंतप्रधानांना विचारले का, महाराष्ट्राला का बरे मदत करीत नाही ? तुम्ही विचारणार तरी काय ? सगळेच उंदीर मांजराच्या गळयात घंटा बांधणार तरी कोण ?, असा सवाल अनिल गोटे यांनी केला आहे. (Anil gote criticizes fadnavis)

भ्रष्टाचाऱ्या विरूध्द राज्य शासनाने काही कारवाई करण्याचं ठरवल की, लगेच बोंबा बोंब, सूडाच राजकारण करताहेत वगैरे वगैरे.  यासाठी भाजपाच्या नेतृत्वाला काही सवाल माजी आमदार अनिल गोटे (Anil gote) यांनी केले आहेत ते खालीलप्रमाणे…

  • नाथाभाऊ खडसेंना, त्यांच्या पत्नीस, त्यांच्या कन्येस, जावायास इ.डी. समोर बोलावणे
  • नवाब मलीक यांच्या जावायास, मुलीस बोलावणे, नवाब मलीकांना ५५ लाख सांगून फक्त ५ लाखासाठी अटक करणे
  • शहारूख खान यांचा मुलगा आर्यन खान याच्या जवळ गुंजभर अमली पदार्थ न सापडता त्याला २५ दिवस तुरूंगात सडवले
  • समीर वानखेडे नावाच्या अधिकाऱ्यास मुक्तहस्ते लुटीला परवानगी देणे
  • सुशांतसिंग राजपुत प्रकरण सी.बी.आय. कडे सोपविण्यासाठी राज्य पोलीसांची देशभर यथेच्च बदनामी करणे

  • दिशा सालीयन प्रकरणात रोज उठून दिशाहीन आरोप करणे.
  • वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना हाताशी धरून विरोधी पक्षाचे नेते अमली पदार्थाचा व्यापार करतात असे खोटेच भासवून त्यांचे फोन टेप करणे.
  • अर्णव गोस्वामी व कंगणा राणावत यांचे विरूध्द जन जागृती केल्याची शिक्षा म्हणून आ. प्रताप सरनाईकांच्या मागे ई.डी.ची. पीडा लावणे.
  • शिवसेना नेते अनिल परब यांच्या रिसोर्टचे निमित्त साधुन करून भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना खलनायक ठरवणे.
  • नागपुरच्या राजकारणात भविष्यात अनिल देशमुख आपल्याला जड पडतील. आता आपण कसे तरी काठावर निवडून आलो.
  • जीवावरचे बोटावर निभावले. अफजल खान होता होता शाहीस्त खान झाला म्हणून देशमुख यांना बदनाम करण्याकरिता त्यांच्या घरावर दर आठवडयाला ९० एक असे छापे घालणे.
  • अजित दादांच्या बहिणी, भाउ इतर नातेवाईकांच्या घरावर छापे घालून तीन तीन दिवस अधिकाऱ्यांना त्याच्या घरात बसवून ठेवणे, बदनामी करणे.
  • पवार कुटूंबातील एकेकाला स्वतंत्र गाठून त्यांना अडचणीत आणणे
  • राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या घरावर छापे घालून अकारण देशभर बदनामी करणे. त्यांची
  • भावनाताई गवळी यांचा सलग पाच वेळा पराभव करू शकलो नाही. याचा बदला घेण्याकरीता त्यांच्या मागे चौकशी लावणे.

  •  आपल्या पक्षातील पाळीवाना धनगरी कुत्र्याप्रमाणे छू म्हटल्याबरोबर सार्वजनिक भुंकण्याचा सामोहीक कार्यक्रम सुरू करणे. हे सर्व जे सुरू आहे ते सूडाच राजकारण नाही तर वात्सल्याचे प्रेमाचे आहे काय ?
  • डॉ. विजयकुमार गावीत यांच्या भ्रष्टाचाराविरूध्द तुम्ही स्वतःच्या बेंबीच्या देठापासून बोंबलून बोबलून त्यांना सळो की पळो करून सोडले पण तुम्हाला शरण येतातच सर्व आल बेल झाला का?
  • ‘कृपाशंकरसिंग त्यांच्या भ्रष्टाचाराविरूध्द रान उठवले ! बिचाऱ्याला तोंड लपवत देशभर फिरावे लागले. लागोपाठ दोन वेळा पराभव स्विकारावा लागला. तुमच्या कळपात दाखल होताच पवित्र झाले!
  •  सुभाष देशमुखांनी महापालिकेच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण करून बांधलेला बंगला अधिकृत आणि अनिल परबांनी खाजगी जागा विकत घेवून बांधलेल्या जागेवरचे रिसोर्ट मात्र अनधिकृत.
  • पंचतारांकीत मजुर प्रविण दरेकर यांच्या भ्रष्टाचाराविरूध्द तुम्ही काय कमी शंख केला होता का? तुम्ही त्यांना ओटीत घेतले अन झाले पवित्र !

मुर्खाच्या नंदनवनात सुरू असलेला त्यांचा नाच त्यांनाच लखलाभ असो

‘तुमच्या पदराखाली आश्रयाला असलेले प्रसाद लाड, राम कदम, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्ध न पाटील यांच्या, प्रामाणिकपणाच्या आणि चारित्र्याच्या महाराष्ट्रात लोक शपथा घेतात. चिक्की घोटाळा, दप्तर खरेदी घोटाळा, शिक्षक भरती घोटाळा, आरोग्य शिबीर घोटाळा, तुमचं जमीन घोटाळे मी काढायला सुरूवात केली तर तोंड लपवायला जागा सापडणार नाही. सिडको जमिन घोटाळा इ. घोटाळयामध्ये आपल्या ५ वर्षातील क्षण आणि क्षण गुंतला आहे.आज एवढेच लक्षात असु दया की, लोकांना काही कळत नाही. या गैरसमजात तुम्ही आहात असेच जर भाजपवाल्याना वाटत असेल तर मुर्खाच्या नंदनवनात सुरू असलेला त्यांचा नाच त्यांनाच लखलाभ असो,असे खणखाणीत उत्तर राष्ट्रवादीचे उपध्यक्ष अनिल गोटे यांनी दिले आहे.


हे सुद्धा वाचा : 

BJP took donations from Mumbai blast accused Iqbal Memon’s firm: Anil Gote

अनिल गोटे यांचा भाजपला ‘वात्सल्य’युक्त टोला !

पडळकरांच्या आडून भाजपने धनगर विरूद्ध मराठा भांडण लावले : अनिल गोटे यांचा आरोप

शरद पवार म्हणाले, ‘गोपीचंद पडळकरांविषयी मला बोलायचे आहे, पण…’

पडळकरांच्या आडून भाजपने धनगर विरूद्ध मराठा भांडण लावले : अनिल गोटे यांचा आरोप

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी