32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeटेक्नॉलॉजीApple Days सेलमध्ये आयफोन १३ मिळतोय ६१,९०० रुपयात; मॅकबूक आणि इतर फोनवर...

Apple Days सेलमध्ये आयफोन १३ मिळतोय ६१,९०० रुपयात; मॅकबूक आणि इतर फोनवर १० हजारापर्यंतची कॅशबॅक ऑफर

टीम लय भारी

तुम्ही अ‍ॅप्पल उत्पादनांवर सूट मिळण्याची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. विजय सेल्समधील Apple Days ऑफरबद्दल जाणून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. अ‍ॅप्पल डेज सेल चांगल्या ऑफरसह विजय सेल्समध्ये ऑनलाइन आणि स्टोअरमध्ये उपलब्ध आहे . २४ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत हा सेल असणार आहे. या सेल्समध्ये आयफोन तसेच अ‍ॅप्पल वॉच सीरिज ७, एअरपॉड्स ३, एअरपॉड्स प्रो, मॅकबुक, आयपॅड्स आणि इतर उत्पादनांवर मोठी सूट मिळणार आहे. आयफोन १३ ची कमीत कमी रु. ६९,९०० इतकी आहे. जुना आयफोन एक्सचेंज केल्यास ही किंमत आणखी कमी होऊ शकते.( Apple Days Sale, IPhone 13 is available for Rs 61,900)

आयफोन १३ वरील ऑफर कशी जाणून घ्या?
विजय सेल्सने आयफोन १३ वर सर्वात मोठी ऑफर दिली असून ६१,९०० रुपयांपर्यंत हा फोन मिळू शकतो. आयफोन १३ ची किंमत ७९,९०० रुपये आहे. परंतु ७५,९०० रुपयांच्या डील किंमतीवर ऑफर केली जात आहे. याव्यतिरिक्त, एचडीएफसी बँकेचे ग्राहकांना कमाल ६ हजार रुपयांचा कॅशबॅक दिला जाईल. त्यामुळे किंमत ६९,९०० रुपयांपर्यंत येते. जर तुमच्याकडे जुना कार्यरत स्मार्टफोन असेल जो तुम्ही एक्सचेंज करू इच्छित असाल, तर विजय सेल्स ५ हजार रुपयांचे किमान एक्सचेंज मूल्य देत आहे. यामध्ये आणखी ३ हजार रुपयांची सूट दिली जाईल. त्यामुळे एकूण १८ हजार रुपयांची सूट मिळेल.

Jio Phone Next : रिलायन्स डिजिटलवर सेल सुरू; जाणून घ्या किंमत आणि ऑफर्स

जिओनं पुन्हा लॉन्च केले पाच नवे प्लान; ग्राहकांना होणार फायदा

अ‍ॅप्पल डेज सेलमध्ये आयफोन १३ मिनी कमीत कमी ६०,४०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. आयफोन १३ प्रोची किंमत १,०८,९०० रुपयांपासून सुरू होते. आयफोन १३ प्रो मॅक्सची किंमत १,१८,४०० रुपयांपासून सुरू होते. आयफोन ११ ची किंमत ४३,४०० रुपयांपासून सुरू होते आणि आयफोन १२ ची किंमत ५६,२०० रुपयांपासून सुरू होते. यात एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी कॅशबॅक ऑफर आहे. ग्राहक उत्पादनांवर १० हजार रुपयांपर्यंतचा लाभ घेऊ शकतात. एचडीएफसी क्रेडिट आणि डेबिट कार्ड वापरकर्त्यांसाठी ६ हजार रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर आहे. आयफोन १३ मिनी ६ हजार रुपयांच्या कॅशबॅकसह उपलब्ध आहे, तर आयफोन १२, आयफोन १३ प्रो आणि प्रो मॅक्स ५ हजार रुपयांच्या कॅशबॅकसह उपलब्ध आहे. दुसरीकडे, आयफोन ११ चार हजार रुपयांच्या कॅशबॅकसह उपलब्ध आहे.
Product Offer Price Cashback (Hdfc CC/DC) Effective Offer Price
iPhone 13 ७५,९०० ६,००० ६९,९००
iPhone 13 mini ६६,४०० ६,००० ६०,४००
iPhone 13Pro १,१३,९०० ५,००० १,०८,९००
iPhone 13Pro Max १,२३,४०० ५,००० १,१८,४००
iPhone 11 ४७,४०० ४,००० ४३,४००
iPhone 12 ६१,२९९ ५,००० ५६,२९९

Samsung ने भारतात लॉंच केला सर्वात स्वस्त स्मार्टफोन, पाहा किंमत आणि फिचर्स !

iPhone 13 price drop makes it better deal than Google Pixel 4A? Check now

IPad 9th Gen २९,६०० ३,००० २६,६००
IPad Air 4th Gen ५०,९०० ४,००० ४६,९००
IPad Pro ६७,५०० ४,००० ६३,५००
Macbook Air with M1 Chip ८३,६१० ६,००० ७७,६१०
Macbook Pro with M1 Chip १,१०,६१० ७,००० १,०३,६१०
Macbook Pro with Latest M1 Pro Chip १,८१,२०० १०,००० १,७१,२००
Apple Watch Series 7 ३९,१०० ३,००० ३६,१००
Apple Watch Series SE २७,९०० २,००० २५,९००
AirPods 2nd Gen १२,४०० १५०० १०,९००
AirPods 3rd Gen १७,३०० २,००० १५,३००
AirPodsPro २०,४९० २,५०० १७,९९०
AirPodsPro with Magsafe २२,९०० २५०० २०,४००
Airpods Max ५०,९०० – ५०,९००
Home Pod Mini ९,४९० १,००० ८,४९०
सर्वात मोठी कॅशबॅक ऑफर मॅकबूकवर उपलब्ध आहे. मॅकबूक Air M1 ७७,६१० रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. एचडीएफसी बँक ग्राहकांसाठी ६ हजार रुपयांच्या कॅशबॅकसह येतो. मॅकबूक Pro M1 १,०३,६१० रुपयांत ७ हजार रुपयांच्या कॅशबॅकसह आहे. मॅकबूक Pro M1 Pro १,७१,२०० रुपयांमध्ये उपलब्ध असून १० हजार रुपयांचा कॅशबॅक आहे. अ‍ॅप्पल वॉच सीरिज ६ तीन हजार रुपयांच्या कॅशबॅक ऑफरसह ३६,१०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे, अ‍ॅप्पल वॉच एसई २५,९०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे, यात २ हजार रुपयांचा कॅशबॅक आहे. एअरपॉड्स प्रो १७,९९० रुपयांत उपलब्ध असून २,५०० रुपयांच्या कॅशबॅक ऑफरसह येतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी