34 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमुंबईमुंबई महानगरपालिका आडनाव बघून कारवाई करते आशिष शेलारांचा आरोप

मुंबई महानगरपालिका आडनाव बघून कारवाई करते आशिष शेलारांचा आरोप

टिम लय भारी

मुंबई : राज्याचे पोलिस हनुमान भक्तांना पकडतात. केंद्रीय यंत्रणा अवैध कामांवर कारवाई करतात, म्हणून महाविकास आघाडी सरकारकडून कारवाई केली जाते. शिवसेनाच्या ताब्यात असेलेली मुंबई महानगरपालिक केवळ आडनाव बघून कारवाई करते असा आरोप आमदार आशिष शेलारांनी (Ashish Shelar) पत्रकार परिषदेत केला. (Ashish Shelar allegation that bmc takes action last name)

पालिकेला खान, पठाण, शेख यांच्या घरातील अनधिकृत बांधकाम झाल्याचे दिसत नाही का? असा प्रश्न आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे. तसेच, मुंबई पालिका आडनाव पाहून कारवाई करत आहे. शिवसेनेला हिंदुत्वाचा विसर पडला आहे, असा आरोपही शेलार यांनी केला. राष्ट्रीय तपास संस्था एएनआयने काल मुंबईत धाडी टाकून दाऊदच्या हस्तकांवर कारवाई केली. मात्र, राज्यातील पोलिस हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांवर कारवाई करत आहे. हाच दोन्ही सरकारमधील फरक आहे. राष्ट्रवादी, हिंदुवादी आणि ढोंगी राज्य सरकारमधील हा फरक असल्याची टीका आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केली.

आमचा कोणत्याही धर्माला विरोध नाही : आशिष शेलार

मुंबईतील नागपाडा, बेहरामपाडा, मोहम्मद अली रोड येथे का होत नाही? गेल्या 25 वर्षांपासून मी राजकारणात आहे. एकदाही या भागात अतिक्रमणविरोधी कारवाई झालेली नाही. या अतिक्रमणांकडे सरकार का दुर्लक्ष करते, असा सवालही आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला. आमचा कोणत्याही जाती धर्माला विरोध नाही. मात्र, दिल्लीतील शाहीनबाग, जहांगिरपुरीतील अतिक्रमणांवर ज्याप्रमाणे कारवाई होती, तसेच, शाहीनबागमध्ये कारवाई होते. तेव्हा मात्र हे सरकार कोल्हेकुई करते, असा टोलाही त्यांनी लगावला.

हे सुध्दा वाचा :- 

Three-party alliance was almost final in 2017, says BJP’s Ashish Shelar; NCP denies

आपण राज्यात शांती, प्रेम प्रस्थापित राहो यासाठी प्रयत्न करूया : जयंत पाटील

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी